Tathagat Vidhyalay-Karbhand
महाराष्ट्र

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद-शहादा च्या वतीने एसटी कर्मचारी यांच्या बेमुदत संपला जाहीर पाठींबा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद-शहादा च्या वतीने एसटी कर्मचारी यांच्या बेमुदत संपला जाहीर पाठींबा

अभाविप शहादा शाखेकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणी साठी चालू असलेल्या संपाला पाठिंबा देण्यात आला.

महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामन्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जणारी ‘लालपरी’ आज बंद आहे. मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळाचे  कर्मचारी एसटीला राज्यसरकार कर्मचारी म्हणून सामावून घेण्याच्या व अश्या विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत. या संदर्भात अनेकवेळी राज्यात आंदोलन देखील झाले आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील राज्यशासनाकडून दिले गेले. परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही.

त्यामुळे पुन्हा मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात तीव्र आंदोलन झालेली आहेत. या आंदोलना दरम्यान ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली या सरकार ला अजून जाग नाही आली.

उदवस्त सरकार चा प्यादा अनिल परब तुम एक काम करो खुर्ची छोडो आराम करो..! एस टी कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा असे बोलत एसटी कर्मचारी संपला अखिल भारतीय विध्यार्थी परिषद (अभाविप) शहादा च्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!