Uncategorized

अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपूर तर्फे मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपूर तर्फे मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

नागपूर:-मातंग समाज आजही इतर समाजाच्या तुलनेत शैक्षणिक द्रष्ट्यिकोनातून फार मागे असलेला समाज आहे. मातंग समाजात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती घडवून यावी आणि हा समाजही सामाजिक द्रष्टिने प्रगत व्हावा.तो मुख्य प्रवाहात यावा यासाठी अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपूर तर्फे मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अशोकराव कांबळे माजी प्राचार्य, कमला नेहरू महाविद्यालय नागपूर,व उदघाटक म्हणून श्री.प्रदीपजी बोरकर,सहा.आयुक्त, विक्री व सेवाकर विभाग,वर्धा हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती आसावरी देशमुख, संचालक,कौशल्य विकास महामंडळ म.रा.,श्री.अरविंदजी डोंगरे, विचारवंत,श्री.रविंद्रन खडसे, सुप्रसिद्ध वउद्योजक,श्री.संजय कठाळे, संस्थापक,लहू सेना, श्री रविंद्रजी वानखेडे,माजी उपरजिस्टार,व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. हे श्री आशिष कांबळे,हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीला संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत  प्रकाश डोंगरे यांना सभागृहात श्रध्दांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली.सर्व प्रथम स्वागत गीत श्रीमती संगीता वाघमारे यांनी सादर केले .

त्यानंतर मातंग समाजातील उच्च शिक्षित डाक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, कलावंत,व प्रतिष्ठित उद्योजक यांचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांना शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विध्यार्थ्यांना  पाहुण्यांनी अतिशय मार्मिक असे मार्गदर्शन केल्यानंतर 80 विद्यार्थ्यांना एक स्कूलबैग, आफिस फाईल, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत वानखेडे यांनी तर आभारप्रदर्शन श्री रायभानजी डोंगरदिवे यांनी केले . याप्रसंगी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य कार्यकर्ते यांनी उपस्थित सर्वं पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व उपस्थितांच्या भोजन नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास मातंग समाजातील समाज सेवक, सामाजिक कार्यकर्ते, राहून सहकार्य केले. अनेक संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!