Tathagat Vidhyalay-Karbhand
महाराष्ट्र

अलंगुणच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात

अलंगुणच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात

सुरगाणा तालुक्यात अनेक दिवसांपासून सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना भयानक असा पाणी साठा वाढल्याने अनेक गावांना पूर परिस्थिती निर्माण झाली.

अशाच पूर परिस्थिती मुळे सुरगाणा येथील अलंगुण गावात धरणाचा सांडवा फुठल्याने अलंगुणच्या नदी किनारी व लगतच्या परिसरातील पंधरा कुटुंबांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत  गुरुवार दिनांक २० जुलै २०२२ रोजी माजि आमदार जिवा पांडू गावित व पंचायत समितीचे सभापती मा. इंद्रजित जिवा गावित, हिरामण जिवा गावित यांच्या समवेत सुरगाणा येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठाचे अध्यक्ष माऊली नितीन रामदास महाले व कार्यवाहक श्री हरीचंद्र आहेर (महाराज) नगरसेवक श्री सचिन रामदास महाले, श्री उत्तमचंद पगारिया, उपप्रादेशिक व्यवस्थापक श्री तुषार मोरे साहेब, श्री प्रशांत मोरे, श्री राजेश पवार, श्री निलेश थोरात स्वामी सेवेकरी  व सोना पागारिया ओम जंगम, चेतन आहेर, अंकुश ,ओम बोरसे ज्ञानेश जंगम, शुभम सूर्यवंशी वृंद यांच्या तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामुळे पूरग्रस्तांचे संसार व जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

प्रतिनिधी:- किशोर जाधव,सुरगाणा-नाशिक

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!