Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हान

अवैद्य टालवर धाड मारून १४ टन हजाचा चोरी कोळसा जप्त, ३ आरोपीवर गुन्हा दाखल

अवैद्य टालवर धाड मारून १४ टन हजाचा चोरी कोळसा जप्त, ३ आरोपीवर गुन्हा दाखल

कन्हान पोलीस व वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी , सुरक्षा रक्षकांची कारवाई

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान  – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उतरेस ०४ किमी अंतरावर असलेल्या टेकाडी शेत शिवारात वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत खुली खदान चा कोळसा चोरून तीन आरोपी ने अवैधरित्या टालवर साठवनुक केल्याचे कन्हान पोलीसांना मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिकाऱ्यास बोलावुन १४ टन कोळसा किंमत ५६ हजार रूपया चा कोळसा जप्त करून कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीने तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार (दि.९) जुन ला सायंकाळी ६ वा. ते ७ वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनचे पोहवा राहुल रंगारी यांनी वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे यांना फोन करून माहीती दिल्याने सुरक्षा अधिकारी आपल्या सुरक्षा रक्षकासह घटनास्थळी पोहचले असता आरोपीतांनी संगणमत करून टेकाडी शिवारात अवैद्यरित्या टाल वर वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत खुली कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा झाडी झुडपात साठवुन ठेवलेला मिळुन आल्याने जप्त करून ट्रक मध्ये भरून वेकोलि च्या वजन काटयावर त्याचे १४ टन वजन करून दगडी कोळसा किंमत ५६,००० रूपया चा मुद्देमाल कोळसा डेपो मध्ये जमा करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी १) भुजंग महल्ले वय ४८ वर्ष २) सुरेंद्र बुधे वय ३५ वर्ष ३) बंटी भुते वय ३० वर्ष तिघेही राह. टेकाडी यांंचे विरुद्ध कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान अपराध पोलीस निरिक्षक कदम यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोस्टे चे सपोनि श्री सतिश मेश्राम हे पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे .

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!