Tathagat Vidhyalay-Karbhand
ब्रह्मपुरी

ओव्हरलोड वाळूचा ट्रक पलटी, सहा मुलं व दोन महिला थोडक्यात बचावले

ओव्हरलोड वाळूचा ट्रक पलटी, सहा मुलं व दोन महिला थोडक्यात बचावले

पिंपळगाव येथील घटना वाळू माफियांची गावाकऱ्यांवर उलट मुजोरी मात्र गुन्ह्यांची नोंद नाही

ब्रम्हपुरी -तालुक्यात वाळू माफियांचा सुरु असलेला धिंगाणा नागरिकांसाठी नवीन नाही चोरी उपर से सीना जोरी चा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. अशीच एक घटना तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली असून लिलाव झालेल्या पिंपळगाव घाटावरून चौदा चक्का वाहणाने विना रॉयल्टी वाळू वाहतूक करणारा भरधावं वेगातील ओव्हरलोड ट्रक स्मशानभूमी परिसरात अनियंत्रित होतं पलटल्याने अगदी जवळच असलेल्या सहा लहान मुलं व दोन महिलांचा जीव थोडक्यात वाचला व मोठा अनर्थ टळला मात्र सदर अपघाताची पोलीस स्टेशनं येथे नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यात पिंपळगाव (भोसले) येथील वैनगंगा नदी पात्रातील वाळू चौदा चक्का एल पी ट्रक क्रमांक MH 40 BG 9633 ने शून्य रॉयल्टी ने ओव्हरलोड वाळू भरुन नेत असतांना पिंपळगाव स्मशानभुमी परिसरात पलटी झाला मात्र नशीब बलवत्तर म्हणुन अगदी जवळच असलेल्या सहा चिमुकले व दोन महीलांच्या विरुद्ध दिशेला ट्रक पलटी झाल्याने मोठा अपघात टळला व सर्व थोडक्यात बचावलेत तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला ही घटना वा-यासारखी परीसरात पोहचताच नागरिकांची गर्दी झाली तर घाट मालकाच्या कामावर असलेले तळीराम घटनास्थळी येऊन, आम्ही असे बहोत पाहीले आमचे कोणीच काही बिगडवु शकत नाही म्हणत लोकांसह मुजोरी करीत गंभीर जखमी ट्रक ड्राइवरला इलाजासाठी नेतांना नागरिकांना धमकावत निघुन गेले.

दिवस-रात्र होणाऱ्या वाळू वाहतुकीने संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले असून अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढले आहेत तर रस्त्यावरून प्रवास करतांना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावं लागत असुन सर्वत्र अपघाताची शक्यता बळावली असल्याने सदर घटनेची प्रशासनाने दखल घेतं कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतं आहे

प्रतिनिधी:
राहुल भोयर,ब्रम्हपुरी-चंद्रपूर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!