Uncategorized

कन्हान परिसरातील दिल्ली दरबार येथे दोन युवकाला गंभीर जख्मी करुन, आरोपी पसार

दिल्ली दरबार येथे दोन युवकाला गंभीर जख्मी करुन आठ आरोपींनी दरोडा टाकुन लुटले १,३९,००० रुपए

परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , आरोपी पसार

फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या नाका नंबर सात येथील दिल्ली दरबार बार अॅंन्ड रेस्टोरेंट येथे आठ आरोपींनी बार मध्ये प्रवेश करुन दोन युवका वर तलवार व चाकु ने प्राणघात हल्ला करुन व चाकुचा धाक दाखवुन काॅंउन्टर मधुन एकुण १,३९,००० रुपए चा मुद्देमाला वर दरोडा टाकुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ ला सायंकाळी ६:५० ते ७:१५ वाजता च्या दरम्यान फिर्यादी आशिष आतरामजी वडस्कर वय ४२ वर्ष राहणार रामनगर कन्हान हे आपल्या दिल्ली दरबार बार अॅंन्ड रेस्टोरेंट मध्ये ड्युटीवर हजर असतांना आरोपी १) सोपान ठाकरे २) लकी भेलावे ३) अक्षीत मेश्राम ४) अजय भेलावे व इतर तीन ते चार अनोळखी इसम सर्व राहणार कांद्री कन्हान यांनी संगमत करुन शुभम सलामे व रोहित यादव यांना जिवे मारण्याचा उद्देशाने बार मध्ये प्रवेश करुन शुभम सलामे व रोहित यादव यांचेवर तलवार व चाकु ने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जख्मी केले व बार चे काॅउन्टर मधुन रोख रक्कम १,१७,००० रुपए , एक विवो कंपनीचा मोबाइल किंमत  १२,००० रुपए व एक रियल मी कंपनीचा मोबाइल किंमत १०,००० रुपए असा एकुण १,३९,००० रुपयाचा मुद्देमाला वर दरोडा टाकुन जबरदस्ती ने तलवार व चाकु चा धाक दाखवुन काॅंउन्टर मधुन घेवुन गेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी आशिष वडस्कर यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन आठ आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक १६५  २०२२ कलम ३९७ भांदवि, सह कलम ४२५ भहका अन्वये गुन्हा दाखल केला असुन

गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!