Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हान

कन्हान येथे आजपासून श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह व मूर्ती प्राण-प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन | kanhan madhye shreemadh bhagvat ghyan | sptah mahotsav suru |

कन्हान येथे आजपासून श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह व मूर्ती प्राण-प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

कन्हान येथे आजपासून श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह व मूर्ती प्राण-प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन | kanhan madhye shreemadh bhagvat ghyan | sptah mahotsav suru |

कन्हान – शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथील श्री हनुमान मंदिरात ९ ते १६ सप्टेंबर दरम्यान श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह व हनुमानजींच्या मूर्ती प्राण-प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत ९ रोजी जलाधिवास, १० रोजी अन्नाधिवास, रात्री १० वाजता शैयाधीवास, ११ रोजी कावड यात्रा सकाळी ८ वाजता कन्हान नदीतून निघणार असुन सायंकाळी ७ वाजता मूर्तीचा अभिषेक व प्राण प्रतिष्ठा आणि १६ रोजी सायंकाळी ७ वाजता गोपाळ कला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मा.आशिष जयस्वाल, नप नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर आदी उपस्थित राहणार आहेत.

श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहांतर्गत दररोज पंडित आशिष कमल शर्मा यांचे प्रवचन होणार आहे. १० सप्टेंबर ला भागवतांचे पुजन, भागवत महात्म्य, नारद-व्यासजी संवाद, परीक्षिताचा जन्म, ११ ला कपिलोपाख्यान, सती चिरित्र, ध्रुव चरित्र, १२ ला अजामिलपाख्यान, प्रल्हाद चरित्र, नृसिंह अवतार, १३ ला गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, रामअवतार, समुद्र मंथन, श्रीकृष्णाचा जन्म, १४ ला नंद उत्सव, श्री कृष्ण लीला, गोवर्धन लीला, १५ ला रासलीला, कंसाचा वध, उद्धव चरित्र, रुक्मिणी विवाह, १६ ला सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष, जीव शरणागत असे कार्यक्रमाचे आयोजन केले असुन दररोज दुपारी ४ ते ७ या वेळेत भागवत कथा सुरू राहणार असुन मोठ्या संख्येने भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक वर्धराज पिल्ले व शिवसेना मित्र परिवाराने केले आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!