Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी

कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी

कन्हान शहर विकास मंच द्वारे महाराजांना मानवंदना

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .

शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सौ.श्रीमती कल्याणी महेश शेंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .

कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , हर्ष पाटील , शाहरुख खान , प्रकाश कुर्वे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

 

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!