Tathagat Vidhyalay-Karbhand
आस्था

कन्हान येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांचा १०२ व्या जयंती निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांचा १०२ व्या जयंती निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान येथे बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा १०२ व्या जयंती निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

आज सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जयंती निमित्य महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे  .

उद्या मंगळवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी ५:३० वाजता सामुहिक हवन , ८:०० वाजता भव्य शोभायात्रा , दुपारी १२:०० वाजता महानत्यागी बाबा जुमदेवजींचे स्वगत , १:०० वाजता मान्यवरांचे स्वागत , १:३० वाजता भगवत कार्याची चर्चा बैठक , सायंकाळी ५:०० वाजता पासुन भोजन ग्रहण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे .

या दोन दिवसीय कार्यक्रमात शहरातील सर्व सेवक , सेवकांनी , आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे कडकडीचे आव्हाहन आयोजकांनी केले आहे .

या कार्यक्रमाचे आयोजक आणि यशस्वितेकरिता संस्थेचे अध्यक्ष गोपीचंदजी सावरकर , उपाध्यक्ष संजय भैस , कोषाध्यक्ष दिनेश देशमुख , सहसचिव मानिकजी पोटे सह आदि सदस्य सहकार्य करीत आहे .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!