कन्हानपारशिवनी

कन्हान येथे सरदार वल्लभ भाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना केले अभिवादन

शाळा , काॅलेज आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान येथे सरदार वल्लभ भाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना केले अभिवादन

शाळा , काॅलेज आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील विविध शाळा , काॅलेज आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे अखंड भारताचे निर्माते लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १४७ व्या जयंती आणि भारताच्या प्रथम महिला प्रधानमंत्री , भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या ३८ व्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सरदार वल्लभ भाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार आणि पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले .

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय , कन्हान

कन्हान रेल्वे स्टेशन रोड वरील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे अखंड भारताचे निर्माते लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती व भारताच्या प्रथम महिला प्रधानमंत्री , भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.बनकर सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.आसटकर सर आदि शिक्षक , शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सरदार वल्लभ भाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बनकर सर , प्रमुख पाहुणे मा.आसटकर सर यांनी सरदार वल्लभ भाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवन चिरित्र्यावर विद्यार्थांना , शिक्षकांना , नागरिकांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक , शिक्षकांनी व विद्यार्थांनी सरदार वल्लभ भाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत कार्यक्रम साजरा करण्यात आला .

आदर्श हायस्कुल , कन्हान

आदर्श हायस्कुल , कन्हान

आदर्श हायस्कुल कन्हान येथे अखंड भारताचे निर्माते लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती व भारताच्या प्रथम महिला प्रधानमंत्री , भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.पुष्पा आर त्रिवेदी (संस्थाअध्यक्षा) आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंद्रकला मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सरदार वल्लभ भाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंद्रकला मेश्राम यांनी सरदार वल्लभ भाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवन चिरित्र्यावर विद्यार्थांना , शिक्षकांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक , शिक्षकांनी व विद्यार्थांनी सरदार वल्लभ भाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन आणि राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला .

येंसबा ग्रामपंचायत कार्यालय येथे सरदार वल्लभ भाई यांची जयंती साजरी

येंसबा ग्रामपंचायत कार्यालय येथे सरदार वल्लभ भाई यांची जयंती साजरी

येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे अखंड भारताचे निर्माते लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १४७ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत सदस्य , कर्मचार्यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी भोजराज घरजाळे , कुमार गडे , हरिदास ऊके , आणि बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते .

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!