कांद्री-कन्हानपारशिवनी

कांद्री फुकट नगर येथुन चोरीचा दगडी कोळसा पडकला

कारवाई दरम्यान मारूती सुजुकी वाहना सह एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

कांद्री फुकट नगर येथुन चोरीचा दगडी कोळसा पडकला

कारवाई दरम्यान मारूती सुजुकी वाहना सह एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस दोन कि मी अंतरावरील फुकट नगर कांद्री कन्हान येथे कोळसा चोरी करून विकण्या करिता जमा केलेला कोळसा कन्हान पोलीसांनी व वेकोलि च्या अधिकऱ्यांनी पकडुन मारूती सुजुकी चारचाकी वाहन आणि कोळसा असा एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.२३ नोव्हेंबर ला दुपारी १२:00 वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे हे आपल्या सुरक्षा रक्षकासह वेकोलि परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली कि फुकट नगर कांद्री वस्ती मध्ये एका व्यक्तीने वेकोलि चा कोळसा चोरून मारोती सुजुकी ८०० एम एच ३१ ए एच ६६९० मध्ये अंदाजे ४०० ते ५०० किलो दगडी कोळसा भरला आहे. या माहिती वरून रविकांत कंडे यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथे फोन करून पोलीसांना बोलावुन फुकट नगर कांद्री ला जाऊन पाहणी केली असता तेथे चोरीचा कोळसा चार चाकी कार मध्ये भरलेला दिसुन आला. सदर दगडी कोळसा हा आरोपी संदीप रमेश बुंदेलिया रा. संताजी नगर कांद्री कन्हान याने चोरून विकणे करिता दगडी कोळसा फुकट नगर येथे जमा केला होता. कोळशाचे अंदाजे प्रति किलो ८ रूपये प्रमाणे ४,००० रूपयाचा कोळसा तसेच मारूती सुजुकी ८०० चारचाकी क्र एम एच ३१ ए एच ६६९० वाहन किंमत अंदाजे ३०,००० रूपये असा एकुण ३४,००० रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीस व वेकोलि सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करून पोलीस स्टेशन कन्हान ला आणुन जमा केला. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तक्रारीने पोस्टे ला आरोपी संदीप रमेश बुंदेलिया यांचे विरुद्ध कलम ३७९ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हुद्यनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील करित आहे.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!