Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

खरकाडा गावात एक गाव एक गणपती

खरकाडा गावात एक गाव एक गणपती

ही संकल्पना पंधरा वर्षापासून कायम…

ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा (रनमोचन) येथील नवनिर्माण गणेशोत्सव मंडळच्या नावाने या गावाने ” एक गाव एक गणपती”ही संकल्पना प्रत्यक्षात साकरण्याची परंपरा गेल्या पंधरा वर्षापासून आजही कायम ठेवली आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावरून त्यां मंडळाचे व गावाचे कौतुक होत आहे.
गणेशोत्सव भारतातील एक लोकप्रिय उत्सव मानल्या जात असून दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. त्यामुळे जवळपास बऱ्याच घरांमध्ये विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन होत असते तर काही गावांमध्ये गणेशोत्सव हा सार्वजनिक मंडळाच्या कडून प्रतिष्ठापना केली जाते. त्यातून एकमेकांमध्ये विविध विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर विषयावर सुद्धा चर्चा केली जाते व सामाजिक दायित्व निर्माण होऊन गावातील शांतता सुव्यवस्था व सामाजिक बांधिलकी अबाधित राखण्यास मदत होते.

मात्र ज्या गावात दोन ते तीन विघ्नहर्ता गणेशाची स्थापना होत असते अशा गावात तंटे भांडण झगडे हाणामारी असे प्रकार घडण्याची शक्यता असते.
मात्र खरकाडा या गावात तब्बल पंधरा वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना नवनिर्माण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने जपली जात आहे.

श्रीच्या स्थापनेच्या दिवसापासून दहा दिवसानंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते तर बऱ्याच ग्रामीण भागात घरगुती अथवा सार्वजनिक मंडळाकडून बाप्पाची स्थापना केली जाते त्यामध्ये अडीच दिवसाच्या गणपती, पाच दिवसाच्या गणपती, सात दिवसाच्या गणपती तर कुणाचा दीड दिवसाचा गणपती, असे प्रकार असतात. खरकाळा गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असून या गावात फक्त एकच सार्वजनिक गणपती बसला आहे हे मात्र विशेष..

*मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन:*

नवनिर्माण सार्वजनिक मंडळाच्या वतीने ही संकल्पना जपली जात नाही तर विविध मार्गदर्शनपर स्पर्धा सांस्कृतिक व इतर कार्यक्रम घेतले जातात त्यामुळे गावात दहा दिवस सलोक्याचे वातावरण राहते…

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!