Tathagat Vidhyalay-Karbhand
ब्रह्मपुरी

गंगाबाई तलमले महाविद्यालयाच्या वतीने जागतिक ओझोन दिन साजरा

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम विविध ठिकाणी केले वृक्षारोपण

गंगाबाई तलमले महाविद्यालयाच्या वतीने जागतिक ओझोन दिन साजरा

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम  विविध ठिकाणी केले वृक्षारोपण

ओझोनच्या थराची गरज काय आहे, हे लोकांना कळावे, त्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. ऑक्सिजनच्या दोन अणूपासून तयार झालेला प्राणवायूचा रेणू मानवी जीवसृष्टीला जीवन प्रदान करतो, तर तीन अणूपासून तयार झालेला ओझोन वातावरणातील स्थितांबरमध्ये जीवसृष्टीचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या घडते. परंतु मानवनिर्मित क्लोरोफ्लोरोकार्बन सारख्या रासायनिक पदार्थामुळे ओझोनचे कवच धोक्यात आले आहे.

हे संरक्षण कवच आपण वाचविले नाही तर आपला विनाश अटळ आहे. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. असे मत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष पिलारे यांनी व्यक्त केले. स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रह्मपुरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित जागतिक ओझोन दिन या कार्यक्रमानिमित्त ते बोलतं होते.

जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसर तसेच ब्रम्हपुरी शहर परिसरामध्ये विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये आवळा, बदाम, गुलमोहर, करंजी, चिकू, पिंपळ, फणस यादी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे.  यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती रॅली काढून ओझोन दिनाचे महत्व लोकांना पटवून दिले.

यावेळी गंगाबाई तलमले महाविद्यालयाचे प्राचार्य लालाजी मैंद, मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत कळसकर, रासेयो विभाग प्रमुख प्रा. संतोष पिलारे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. जयगोपाल चोले, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतुल नंदेश्वर, प्रा. डिंपल तलमले, प्रा. माधव चुटे, प्रा. स्मिता पिलारे, प्रा. अंकुश ठाकरे, प्रा. तृप्ती नागदेवते व बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!