Uncategorized

गगन मलिक(श्रमण अशोका )डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्वपूर्ण स्थळांना भेटी देणार-संकल्पपूर्ती ची माहिती देणार

गगन मलिक(श्रमण अशोका )डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्वपूर्ण स्थळांना भेटी देणार , संकल्पपूर्ती ची माहिती देणार

गगन मलिक, सिने अभिनेता,यांनी थाईलंड देशा च्या राजधानीचे शहर, बैंकॉक येथे काही दिवसापूर्वी बौद्ध पध्यतीने वॉट थोंग बुद्धिस्ट टेम्पल येथे पूज्यनिय प्रमुख भिक्खु चे हस्ते श्रामणेर झाले.

येत्या काही दिवसातच थाईलेंड येथिल भिक्षुसंघा सोबत त्याचे भारतात आगमन होणार असुण मुंबई पासुन बाबासाहेबांच्या धम्मक्रांती साठी प्रसिध्द असलेल्या भूमीस नमन करण्यासाठी ,थायलंड च्या प्रमुख भिक्खु संघासोबत जाणार आहेत।
बौद्ध धम्मचा संपूर्ण जगात प्रचार-प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकानी बुद्धिस्ट मोनेस्ट्री(निवासी)84 हजार स्तूप निर्माण केले. सम्राट अशोक यांचे बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अतुलनीय कार्य आहे।

ज्यांनी ज्यांनी बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार केला ,त्या सर्व आदरणीय महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून ,वर्तमान काळात गगन मलिक यांनी खालीलप्रमाणे कार्ययोजना कार्यान्वित करण्यासाठी आखली आहे।

1 ) संपूर्ण भारतात 84000 बुध्द मूर्तीचे वाटप करणे।

2) जगातील विभिन्न बौध्द देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करणे।

3) बुध्द धम्म प्रचारासाठी मोठी Buddhist Monastery मध्य भारतात स्थापन करणे।

4 ) भिक्खु प्रशिक्षण केंद्र सुरू करणे।

5) बुध्द धम्म प्रचार साठी ईतर आवश्यक संसाधन निर्मिती करणे।

या संकल्पास बुध्द राष्ट्रातील अनेक संस्था ,उपासक ,उपासिका यांनी श्रमण अशोका( गगन मलिक) यांचे अभिनंदन केले आहे।

हा संकल्प भारतात प्रत्यक्षात आणण्यासाठी
डॉ.बाबासाहेब अम्बेडकर यांचे पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमि जसे महाड़ (रायगड),चैत्त्यभूमि दादर,येवला नाशिक ,भीमा कोरेगाव पुणे,परभनी,औरंगाबाद,धम्मक्रांति नागपुर दीक्षाभूमि,चंद्रपुर दीक्षाभूमि,ड्रेगण टेम्पल कामठी,महू जन्मस्थल इत्यादि ठीकानी ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय( मुख्यत्वे थाई भिक्खु संघ ) भिक्खु संघासोबत, धम्मरैली द्वारा भेंट देणार आहेत.

तसेच साँची(भोपाल),बुद्धगया,सारनाथ,लुम्बिनी,श्रावस्ति,कुशीनगर,वैशालीया सर्व ठीकाणी अभिवादन कार्यक्रम होणार आहे.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!