ब्रह्मपुरी

गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र ब्रम्हपुरीत सुरू करा:-प्रशांत डांगे

गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र ब्रम्हपुरीत सुरू करा:-प्रशांत डांगे

ब्रम्हपुरी:- चंद्रपूर , गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्यापीठ निर्मिती म्हणजेच या भागातील विद्यार्थ्यांना मिळालेली खास पर्वणी यात दुमत नाही. मात्र ब्रम्हपुरी, सिदेवाही, सावली, चिमूर , तळोधी , नागभिड ब्रम्हपुरी , वडसा , कुरखेडा वैरागड , कोरची , आरमोरी या तालुक्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कामाकरीता नेहमी जाणे येणे करावे लागते ते आर्थिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना परवडणारे नाही . त्याच बरोबर विद्यापीठीय काम लवकर होत नसल्यामुळे अनेकदा सायंकाळ होत असते अशा परिस्थितीत साधनांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी आपल्या गावी पोहचू शकत नाही. अशा अनेक समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे ब्रम्हपुरी हे ठिकाण वरील नमूद तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे . त्याच बरोबर जाणे येणे करीता प्रवासाचे साधने असून ब्रम्हपुरी हे ठिकाण सर्वांना सोईचे,जवळचे व आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना परवडणारे आहे. त्यामुळे सदर मागणीचा योग्य तो विचार करून लवकरात लवकर ब्रम्हपुरी येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे उपकेंद्र द्यावे. अन्यथा आम्ही आपल्या या मागणी करीता आंदोलनाचा पवित्रा घेऊ. करीता आपण आमच्या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय द्यावा अशा आशयाचे निवेदन ब्रम्हपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिले. यावेळी निवेदन देतांना नंदकिशोर गुद्देवार, गोवर्धन डोनाडकर, दत्तात्रय दलाल, प्रशांत रामटेके, निशांत अंबादे, मनोज रामटेके, सुरेश वंजारी ,अमोल सलामे, सागर मेश्राम, जतीन मेश्राम, प्रशांत राऊत आदी उपस्थित होते.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!