Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

जनआक्रोश मोर्चात दिसला आंबेडकरी समाजाचा आक्रोश

इंद्र कुमार याच्या हत्यारास भर चौकात फाशी द्या

जनआक्रोश मोर्चात दिसला आंबेडकरी समाजाचा आक्रोश

इंद्र कुमार याच्या हत्यारास भर चौकात फाशी द्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आपल्या भारत गणराज्यातील राजस्थान मध्ये जालौर जिल्हातील खाजगी शाळेच्या छैल सिंह या मुख्याध्यापकाने त्याच्याच शाळेतील इंद्र कुमार मेघवाल या विद्यार्थ्यांस दलित, अघुत असे संबोधत माझ्या माठातील पाणी का पिलास म्हणून जातीयवादी शिव्या देत बेदम मारहाण केली. ती मारहाण एवढी भयानक होती की, त्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या जातीयवादी मारहाण प्रकरणात निष्पाप असणाऱ्या इंद्र कुमार याची हत्या झाली. या हत्येस जबाबदार असणारा त्याचा मुख्याध्यापक शैल सिंह याला भर चौकात फाशी द्यावी. जेणेकरून असे प्रकार होण्यास अडथळा होईल.

भारतीय संविधानाच्या कलम १७ नुसार अस्पृश्यता जर नष्ट केली आहे. तर असे प्रकार का घडतात दलितांवरील अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत याचा अर्थ संविधानाची अमलबजावणी दिसत नाही. त्यामुळे संविधानाच्या अंमलबजावणीकडे जातीने लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे. . स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात अशा घटना स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याला धोका पोहचवणाऱ्या आहेत.

त्यामुळे अशा देशविघातक शक्तीचा नायनाट व्हावा व जालौर कांडातील आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, याकरीता ब्रह्मपुरी शहरातील फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर जीवन यापन करणाऱ्या समस्त आंबेडकरी समाज, ब्रम्हपुरी ने शहरातील संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन  पक्ष, संघटना, गटबाजी बाजूला सारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी चळवळीचे कार्यकते म्हणून केली. व इंद्रकुमार मेघवाल या निष्पाप बाळास न्याय देण्यासाठी व जातीयवादी विचारांचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने  सहभागी उपस्थित होते.

हुतात्मा स्मारक ते तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी या मार्गावर निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व सुरज मेश्राम, डॉ. स्निग्धा कांबळे, सतिश डांगे,  नरेश रामटेके, ॲड.आशिष गोंडाणे , पदमाकर रामटेके, वैकुंठ टेंभुर्णे, रक्षित रामटेके, डेनि झेंडे, राजेश माटे, विवेक रामटेके, उत्पल नागदेवते, मनिषा गेडाम, तथा समस्त आंबेडकरी समाजबांधव ब्रम्हपुरी यांनी केले.

 

प्रतिनिधी, राहुल भोयर-चंद्रपूर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!