Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

जिल्हा परिषद वर धडकला आक्रोश मोर्चा:थाळी वाजवून वेधले सरकारचे लक्ष

आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या

जिल्हा परिषद वर धडकला आक्रोश मोर्चा ,थाळी वाजवून वेधले सरकारचे लक्ष

आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या… आयटक ची मागणी

आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा  चंद्रपुरच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांचा  29 ऑगस्टला  कॉ विनोद झोडगे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आझाद बगीचा येथुन निघालेला मोर्चा जिल्हा परिषद वर धडकला. जोरदार नारे देत  शहरवासीयांचे लक्ष केंद्रीत करत थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधले. यानंतर गौरकर मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गहलोत यांना निवेदन देऊन विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली. एप्रिल महिन्या पासून  जिल्ह्यात मानधन थकीत असल्यामुळे आशा व गटप्रवर्तक संतप्त झाल्या होत्या.

सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा रूपये २५०००– हजार  किमान वेतन द्या,कंत्राटी कर्मचारी यांचे प्रमाने सुसूत्रीकरणात गटप्रवर्तकांचा समावेश करा व त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाने वेतन व भत्ते द्या , आरोग्य खात्यातील रीक्त पदावर ५० % जागा पात्रतेनुसार आशा व गटप्रवर्तक महिला मधुन भरा , वर्धिनी आरोग्य केंद्रातील थकीत मानधन व थकीत मोबदला  मानधन ताबडतोब अदा करा व या पुढे नियमीत दरमहा ५ तारखेच्या आत माणधन अदा करा .अंगणवाडी कर्मचाऱ्यां प्रमाणे दिवाळी भाऊबीज लागू करा. ग्राम पंचायत स्तरावरून कोरोना संपेपर्यंत मागील मे 2020 पासून मासिक 1000 रु प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्यात यावा. ह्या प्रमुख मागण्यासह एकून १९ मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोर्चाचे नेतृत्व  कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक,  कॉ.रवींद्र उमाटे कार्याध्यक्ष  आयटक , कॉ प्रकाश रेड्डी,कॉ राजू गईनवार,गिरीश शास्त्रकार,कॉ निकिता निर, कॉ फरजाना शेख, कॉ ममता भीमटे,कॉ मनीषा नंदगिरवार,कॉ वैशाली भंडारे, कॉ जोत्सना ठोंबरें, कल्पना मिलमिले,आशा रामटेके,अपर्णा धनविजय,सविता झाडे,प्रतिमा कायरकर,प्रमिला बावणे ,सुषमा येणगनटीवार ,मंदिरा देवतळे,सुचित्रा काळे जिल्हाकार्यकारणी आयटक यांनी केले.

मागील एप्रिल महिन्यापासून मानधन थकीत आहे आशा व गटप्रवर्तकांना सध्या लागू असलेले वेतन सुद्धा मिळालेले नाही.व वर्धिनी आरोग्य केंद्रातील मानधन १ वर्षा पासुन थकीत आहे

याबाबत जिल्हा आरोग्य अधीकारी यांनी तातडीने सर्व त्यांच्या अधिकारातील मागण्या निकाली काढण्याचे शीष्टमंडळाला आस्वासन दिले ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्या कामाची सक्ती आशांच्यावर केली जाते ती थांबवावी अशी मागणी केली असता ,याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये असा प्रकार घडत असेल त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करावा समस्या सोडवण्यात येईल. ज्या मागण्या शासन स्तरावर त्या संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभियान व  शासनाकडे पाठवून देण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आश्वासन दिले. मागण्या निकाली निघाल्या नाही तर नागपूर हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मोर्चात हजारोच्या संख्येने आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!