Tathagat Vidhyalay-Karbhand
टेकाडीपारशिवनी

टेकाडी ते हनुमान मंदिर जामसावळी ला श्री हनुमान पालखी पदयात्रेचे प्रस्थान

टेकाडी ते हनुमान मंदिर जामसावळी ला श्री हनुमान पालखी पदयात्रेचे प्रस्थान

टेकाडी ते हनुमान मंदिर जामसावळी ला श्री हनुमान पालखी पदयात्रेचे प्रस्थान

रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय च्या जयघोषात दुमदुमली टेकाडी! विविध ठिकाणी श्रीराम भक्तांनी फुलांच्या वर्षाने अल्पोहार वितरित करुन केले जोरदार स्वागत

कन्हान-शहरा पासुन ३ किमी अंतरावर असलेल्या टेकाडी गावातुन हनुमान मंदिर टेकाडी पंच कमेटी द्वारे दरवर्षी मोठ्या उत्साहात टेकाडी ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रे चे आयोजन करण्यात येते. त्याच पार्श्वभुमीवर या वर्षी सुद्धा तीन दिवसीय पालखीचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार (दि.२३) फेब्रुवारी ला श्री हनुमान मंदीर टेकाडी मंदिरात पालखी पदयात्रेचे जिल्हा परिषद नागपुर माजी अध्यक्षा व सदस्या सौ. रश्मी बर्वे, पंचायत समिति उपसभापती कु.करुणाताई भोवते, कांद्री ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांच्या हस्ते पुजन, महाआरती व परिसरात प्रसाद वाटप करून पदयात्रा सुरूवात करण्यात आली.

पदयात्रा सुरूवात करित गाव भ्रमण करून टेकाडी येथुन निघाली असता नागपुर, जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर सावजी भोजनालय जय दुर्गा मंगल कार्यालय येथे श्रीराम भक्तांनी फुलाच्या वर्षाने स्वागत व अल्पोहार वितरित करुन पालखीचे जोरदार स्वागत केले.

पालखी पदयात्रा कांद्री, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक होत ब्रुक बॉंड गेट कन्हान समोर आली असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी खासदार आणि ग्रामोन्नती प्रतिष्ठान संघटने चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाशभाऊ जाधव यांच्या सौजन्याने पालखीचे फुलाच्या वर्षाने, अल्पोहार, चाय वितरित करुन पालखीचे जोरदार स्वागत करुन पदयात्रेचे कामठी मार्गे जामसावळी करिता प्रस्थान करण्यात आले.

शनिवार (दि.२५) फेब्रुवारी ला जामसावळी येथे महाप्रसाद वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.

या प्रसंगी आशा राउत, नत्थू मोहाडे, गोपिनाथ गुरधे, सचिन साळवी, महेंद्र भुरे, पुरुषोत्तम येनेकर, रुपेश सातपुते, हबीब शेख, बंटी हेटे, दिलिप राईकवार संतोष गिरी, गुड्डू शर्मा, मनोज गुर्धे, सचिन चकोले, योगेश चकोले,  राजकुमार बावणे, अमोल मोहपे, शिव स्वामी  सुनील हटिले, मदिना शेख, राहुल मगर, संध्या साखरे, कल्याणी सरोदे, सरोज यादव, वालदे ताई, पंचफुला इंगळे, चेतन ठवरे, भरत गोखे, मनोज लेकुरवाडे,पंढरी बालबुधे, सुरेश खोरे, रवि मोरे, राजु शेन्द्रे, रमेश बालपान्डे, नन्दु लेकुरवाडे, मनोज गुरधे, अमित वासाडे, सुरेश मोरे,जयदेव सातपैसे, धोन्डबा हुड, प्रविन लेकुरवाडे, प्रज्वल गाडबैल सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य करीत आहे.

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!