Tathagat Vidhyalay-Karbhand
नागपूर

‘डेटा मॅच्युरिटी फ्रेमवर्क’मध्ये नागपूर स्मार्ट सिटीला पाचवे स्थान, वेस्ट व्यवस्थापनात ‘फाईव्ह स्टार’

‘डेटा मॅच्युरिटी फ्रेमवर्क’मध्ये नागपूर स्मार्ट सिटीला पाचवे स्थान, वेस्ट व्यवस्थापनात ‘फाईव्ह स्टार’

नागपूर, दि. २६ : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे शुक्रवारी (ता. २५) स्मार्ट सिटी पुरस्कार २०२०, हवामान स्मार्ट सिटी असेसमेंट फ्रेमवर्क (सीएससीएएफ) २.० आणि डेटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्क (डीएमएएफ) आदींचे निकाल जाहीर करण्यात आले. डेटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्क या कॅटेगरीत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) १०० शहरांमध्ये पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तसेच Climate असेसमेंट फ्रेमवर्क च्या सर्व मानकांमध्ये १५६० / २८०० गुणांसह थ्री स्टार गुण प्राप्त झाले असून वेस्ट व्यवस्थापनासाठी फाईव्ह स्टार गुणांक मिळाले आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना सीईओ भुवनेश्वरी एस. म्हणाल्या, स्मार्ट सिटी पुरस्कार सामाजिक बाबींच्या विषयांवर देण्यात आला. यामध्ये शासन, संस्कृती, नागरी पर्यावरण, स्वच्छता, अर्थव्यवस्था, अंगभूत पर्यावरण, पाणी आणि शहरी गतिशीलता या बाबींचा समावेश होता. स्मार्ट सिटीजच्या climate असेसमेंट फ्रेमवर्क (सीएससीएएफ) २.० चे निकाल माननीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री श्री हरदीपसिंग पुरी यांनी जाहीर केले.

सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, मंत्रालयाने वेस्ट व्यवस्थापनाच्या थीमवर नागपूर शहराच्या कामगिरीची देखील नोंद घेतली आहे. ‘ओला कचरा प्रक्रियेचा विस्तार’ या थीम अंतर्गत शहराच्या तयारी अहवालात विशेष उल्लेख केला आहे. शहरी नियोजन – हरित आवरण आणि जैवविविधता, ऊर्जा आणि ग्रीन इमारत, गतिशीलता आणि हवेची गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन आणि वेस्ट व्यवस्थापन या पाच हवामान संबंधित मापदंडांवर मूल्यांकन करण्यात आले आहे.

यासोबत ‘डेटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्क’चे निकालही जाहीर करण्यात आले. यात सिस्टीमॅटिक मॅच्युरिटी पिलर – पॉलिसी, लोक, प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि परिणामांच्या पाच घटकांचा समावेश आहे. या मूल्यांकनात १०० स्मार्ट सिटीजमध्ये नागपूर शहर पाचव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!