Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

ब्रम्हपुरी :- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे विराजमान होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीकांतजी राऊत, अध्यक्ष, टीचर्स करिअर एज्युकेशन सोसायटी, मौशी ता. नागभिड लाभले होते. इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. रुपेश मेश्राम, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुफान अवताडे याप्रंगी विचार मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्रीकांतजी राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकून तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी चळवळीतील तमाम महापुरुषांचे विचार हे समाजाच्या सर्वागीण विकासासाठी आजही प्रासंगिक आहेत असे भाष्य केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे यांनी आजच्या तरुण पिढीने शिवाजी महाराज यांना आपल्या जीवनात आदर्श मानून यशाचे शिखर गाठावे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी अक्षय बरडे या विद्यार्थ्याने आपले प्रासंगिक मनोगत व्यक्त केले तर प्रज्वल मेश्राम या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. संगीत विभाग प्रमुख प्रा.गणेश तीवाडे यांनी हार्मोनियमवर गीताला स्वरसाथ दिली.

कार्यक्रमाचे संचालन आदर्श अमृतकर तर आभार रोशन रामटेके या विद्यार्थ्याने मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते.

राहुल भोयर प्रतिनिधी

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!