Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह संपन्न

ब्रम्हपुरी :- स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे दिनांक 14 ऑक्टों. 2021 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करून आणि सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अझिझुल हक यांनी भूषविले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा ब्रम्हपुरीच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे प्रमुख अतिथी म्हणून विचारमंचावर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश मेश्राम आणि प्रा. योगिता रामटेके यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व प्रतिपादन करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बुद्ध धम्माची संकल्पना विशद केली.

कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रुपेश मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाला शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!