Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूर

डोंगा खरेदीसाठी आ. विजय वडेट्टीवार कडून चाळीस हजाराची आर्थिक मदत

डोंगा खरेदीसाठी आ. विजय वडेट्टीवार कडून चाळीस हजाराची आर्थिक मदत

तालुक्यातील रनमोचन गावातील शेतकऱ्यांना डोंगा खरेदीसाठी चाळीस हजार रुपयाची मदत माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने

रनमोचन येथील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

बोळेगाव ते रणमोचन यांच्या मधोमध भूती नाला आहे तो नाला पावसाळ्याचे दिवसात दुथडी तुडुंब भरून वाहत असतो शिवाय रणमोचन गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी बोळेगाव शेत शिवारात आहेत नाल्यातून शेतीवर ये जा करण्यासाठी बेटाळा ते पारडगाव वरून जवळपास 15 ते 16 किमी अंतर पार करून बोळेगाव शेत शिवारात जाऊन शेती करावी लागत होती. ही मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती याबाबत पुलीयाचा प्रस्ताव सुद्धा मंत्री महोदयाकडे पाठवण्यात आला होता मात्र सदरहू तातडीची मागणी लक्षात घेऊन रनमोचन येथील शेतकऱ्यांची व्यथा समजून क्षणाचाही विलंब न करता आ. विजय वडेट्टीवार यांनी तातडीने रणमोचन येथील शेतकऱ्यांना शेतीवर ये जा करण्यासाठी डोंगा खरेदीसाठी चाळीस हजार रुपयाची मदत केली ही मदत ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात देण्यात आली.

यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. राजेश कांबळे प्रमोद मोटघरे, कार्यालय संपर्क प्रमुख सुधीर पंदीलवार, जगदीश आमले, राजेश पारधी, गोवर्धन दोनाडकर, विनोद दोनाडकर, टिकाराम प्रधान, विश्वनाथ तोंडरे, पांडुरंग प्रधान, गंगाधर राऊत, घनश्याम दोनाडकर, संदीप मांदाळे, ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान

, युवराज दोनाडकर गजानन दोनाडकर, जनार्धन राऊत, परमानंद पत्रे, प्रकाश ढोरे, गंगाधर राऊत, भाऊरावजी दोनाडकर, प्रकाश कुथे, मोरेश्वर गुरुनुले, पुरुषोत्तम मैंद, कैलास कुथे, यांच्यासह बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!