Uncategorized

थाईलैंड देशातून आणलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीचे वर्षावास समापन दिनी अनावरण

वर्षावासाच्या पावन दीनावर तथागत बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण करून वर्षावास उपासाचे समापन करून करण्यात आले परिसर बुद्धमय

पारशिवनी तालुका  (कन्हान) : – शुक्रवार (दि.३०/१०/२०२०) ला सायंकाळी ५ वाजता सुजाता बुद्ध विहारात भंते आर्य नागाअर्जुन सुरई ससाई व रामटेक क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मुर्ती चे अनावरण करण्यात आले. कन्हान  शहरातील नाका नंबर सात येथे मागच्या डिसेंबर महिन्यात सुजाता बुद्ध विहारात थाईलैंड वरून तथागत गौतम बुद्धांची मुर्ती आणण्यात आली असुन त्या मुर्तीचा अनावरण सोहळा शुक्रवार ला पार पाडण्यात आला. सुजाता बुद्ध विहार नाका नंबर सात येथे मागचा वर्ष डिसेंबर२०१९मध्ये  थाईलैंड येथुन तथागत गौतम बुद्धां ची मुर्ती आणण्यात आली होती. मार्च महिन्या पासुन देशात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लावलेलेली टाळे बंदी आणि संचारबंदीमुळे मुर्ती अनावरण सोहळा थांबला होता. पण देशात अनलॉक ५ च्या प्रक्रियेत शिथिलता मिळाल्याने बुद्ध मूर्तीचे अनावरण करण्यात आले ह्यावेळी प्रामुख्याने उपस्थित भंते आर्य नागाअर्जुन सुरई ससाई व रामटेक क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी व माजी नगराध्यक्ष शंकर चाहांदे, माजी सरपंच दौलतराव ढोके, विनायक वाघधरे, भगवान नितनवरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन सुजाता बुद्ध विहार महिला मंडळांनी करून कार्यक्रम यशस्वि ते करिता भाजपा तालुका महामंत्री संजय रंगारी, दिपनकर गजभिये, धम्मा ऊके, चंपाबाई गजभिये, प्रतिभा रंगारी, शालु बेलेकर, बेबीबाई वासनिक, मालन ढोके, पौर्णिमा नंदेश्वर, सत्यभाग डहारे, अर्चना ऊके, काजल नागदेवे आदींनी सहकार्य केले.

अतुल हजारे, कन्हान नगरपरिषद विरोधी पक्षनेता राजेंन्द्र शेंदरे, नगरसेविका संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, अनिता पाटील, लक्ष्मी लाडेकर, सुनिल लाडेकर बाळु नागदेवे  राखी परते, शालिनी बर्वे, रिंकेश चवरे, शैलेश शेळकी, धर्मेंद्र गणवीर, मयुर माटे, प्रविण गोडे, ऋृषभ बावनकर, प्रदीप बावने, अखिलेश मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण, ओम कुंभलकर,जाॅकी मानकर, शाहरुख खान,नितिन मेश्राम, सोनु खोब्रागडे..आदी मान्यवर उपस्तिथ होते.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!