चंद्रपूरब्रह्मपुरी

दलित विद्यार्थी हत्याकांडातील शिक्षकास फाशी द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी

दलित विद्यार्थी हत्याकांडातील शिक्षकास फाशी द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी

संपुर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना, एकीकडे जातीवादी विचारसरणी देशात वावर करताना दिसत आहे. रोज दलित आदिवासी समाजातील जनतेला या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष झाले मात्र दलित आदिवासी समाज हा सामाजिक गुलामीच्या जखडातून अजुनही बाहेर पडलेला नाही. पुर्वीच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना या जातीवादी मानसिकतेला अनेकदा तोंड द्यावे लागले मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांनीच लिहिलेल्या संविधानावर देश लोकशाही मार्गाने चालत असताना एकीकडे मात्र दलित आदिवासी समाजाला अजुनही सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही.

अश्या अन्याय अत्याचाराच्या घटना देशहिताच्या दृष्टीने कलंकित व निंदनीय आहेत. राजस्थान येथील जालोर जिल्हा सुराणा सायली येथील सरस्वती विद्यालयातील मुख्याध्यापक छाईल सिंह या शिक्षकाने 9 वर्षीय इंद्रपाल मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शाळेतील मडक्यातील पाणी पिण्याच्या कारणावरुन बेदम अमानुष मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या कान आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने अखेर तेवीस चोवीस दिवसांत त्या विद्यार्थ्याचा मृत्यु झाला. एका पाण्याच्या घोटासाठी त्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. अश्या जातीवादी मानसिकतेतुन हत्या करणाऱ्या त्या शिक्षकाला फाशी देण्यात यावी. याविषयीचे तक्रार निवेदन वंचित बहुजन आघाडीने ठाणेदार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांचे मार्फत प्रधानमंत्री यांना देण्यात आले.

मागणी पुर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा सुध्दा देण्यात आला. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते डॉ प्रेमलाल मेश्राम, पुर्व जिल्हा आय टी सेल प्रमुख लिलाधर वंजारी, तालुकाध्यक्ष सुखदेव प्रधान, अनिल कांबळे, नरेंद्र मेश्राम, सुशील बन्सोड, एजूस गेडाम, कमलेश मेश्राम, रामपाल यादव मनीषा उमक, सुकेशनी बन्सोड, डी एम रामटेके, दीक्षित गजभिये, अनंता मेश्राम, जयप्रकाश धोंगडे, रोहित यादव, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!