Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

दिनांक ५ जुलै २०२१ पासून सुरु असलेले कन्हान शिवसैनिकांचे साखळी उपोषणाला मिळाले यश, कन्हान नगर परिषद च्या रिक्त जागा भरणार. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदार आशिष जैस्वाल यांची चर्चा. 

दिनांक ५ जुलै २०२१ पासून सुरु असलेले कन्हान शिवसैनिकांचे साखळी उपोषणाला मिळाले यश, कन्हान नगर परिषद च्या रिक्त जागा भरणार. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदार आशिष जैस्वाल यांची चर्चा. 

कन्हान शिवसेना कार्यकर्त्यांच्या अथक प्रयतनाल मिळाले यश.कन्हान शिवसैनिकां द्वारे, कन्हान नगर परिषदच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरु असलेल साखळी उपोषणाला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल यांनी,

लस्सी पाजून साखळी उपोषणाला दिली स्थगिती. सर्व मागण्या मान्य करून घेत्या, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केली चर्चा.

कन्हान(पारशिवनी):- दिनांक ५ जुलै २०२१ पासून सुरु असलेले शिवसैनिकांचे साखळी उपोषणाला मिळाले यश. ५ जुलै पासून सुरु असलेल साखळी उपोशनाचे मुख्य हेतू हे होते कि कन्हान नगर परिषद २०१४ मध्ये ग्रामपंचायत ची नगर परिषद मध्ये परिवर्ती करण्यात आली होती व सध्या कन्हान नप ‘क’ वर्गातील नगर परिषद आहे. पन अध्यापही कन्हान नगर

 

परिषद ला स्थाई प्रभारी व मुख्याधिकारी लाभलेला नाही व कन्हान नप च्या प्रशासनाच्या कामाचा व्याप इतका जास्त आहे

 

कि जनतेला एका कामासाठी नप कार्यालयाचा छोट्या-छोट्या कामाला चकरा माराव्या लागत असत व जनतेच रोष मोठ्या प्रमाणात प्रकट व्हायला लागल असल्या, सर्व बाब विचारात घेता नगर परिषद प्रशासनाची कामे मंद गतीने होत होती व प्रशासनाच्या कामाला गती प्रदान करण्यासाठी,

 

कन्हान नगर परिषद ची रिक्त पदे भरणे अति आवश्यक असल्यानी त्यावर पदभार प्रभारी स्थाई करणे. मुख्याधिकारी स्थाई असणे, कर्मचारी वर्ग नियोजित कामावर कार्यरत असणे. इत्यादी बाबीनाचा विषय विचारार्थ घेता शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी साखळी उपोषणाचा मार्ग पत्करला.

व दि.५जुलै२०२१ पासून वर्धराज पिल्ले (उपजिल्हा प्रमुख-नागपूर ग्रामीण, शिवसेना) यांच्या अध्यक्षतेत साखळी उपोषणाला सुरवात करण्य्यात आली. सध्या कन्हान नगर परिषद हि रामटेक लोकसभा व रामटेक विधानसभा च्या पारशिवनी तालुक्यात येतो व रामटेक लोकसभा खासदार व रामटेक विधानसभा आमदार हे दोन्ही शिवसेना पक्ष चे आहे व स्थानिक स्वराज्य संस्था कन्हान नगर परिषद मध्ये  अध्यक्ष व उपाध्यक्ष हेही शिवसेना पक्षा चे आहेत. इत्यादी बाबींचा विचारन केली असता जनतेचा रोष शिवसैनिकांवर निघत असल्यंनी, कन्हान नगर परिषद

च्या रिक्त जागा लवकरात लवकर भरून काढण्यासाठी शिवसेना पदाधिकारी यांनी साखळी उपोषण ची सुरवात केले व दिनांक ८ जुलै २०२१ ला स्थानिक आमदार श्री आशिष जैस्वाल यांनी उपोषण स्थानी भेट दिली सर्व शिवसैनिकांच्या मागण्या ऐकून त्या विषयावर कन्हान नगर परिषद चे अस्थाई मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. व रिक्त पद भरण्यास प्रेरित केले तसेच स्थनिक आमदार यांनी नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी मुंबई मनसून अधिवेशन च्या दरम्यान चर्चा करून रिक्त पदाची भरणा करण्यास अनुमती पत्र घेतले. रामटेक विधानसभ क्षेत्राचे आमदार श्री आशिष जैस्वाल यांनी सतत नगर विकास मंत्री यांच्याशी चर्चा केली

 

जिल्हाधिकारी,तहसीलदार यांचा पाठपुरावा करून रिक्त पदे भरण्यास सांगितले येत्या ३० जुलै २०२१ पर्यत कन्हान नप स्थाई कर्मचारी,प्रभारी , भारती करून देतील अशी ग्वाही दिली व ८ जुलै२०२१ ला समस्त उपोषण कर्ते यांना लस्सी पाजून उपोषण सोडण्यास मदत केली.

उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने नगर परि

षद कन्हान कार्यालयास मोठ्या प्रमाणात रिक्त पदांवर कर्मचारी उपलब्ध नाही या करिता मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पत्र देवून नगर परिषद कन्हान पिपरी येथे तत्काळ रिक्त पदांवर कर्मचारी उपलब्ध करून देण्यात करिता विनंती अर्ज सादर करण्यात आले होते. दिनांक ०५ जुलै २०२१ रोज सोमवार पासून कार्यालय नगर पालिका कन्हान समोर शिवसेना पक्षा तर्फे उपोषण करण्यात येणार आहे असे पत्र सादर करण्यात आले होते.

मा.एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई मा. कृपाल तुमाने साहेब खासदार, रामटेक लोकसभा  मा.आशिषजी जयस्वाल आमदार, रामटेक विधानसभा यांना माहितीस्तव सविनय माहिती सदर करण्यात आली होती

उपोषणा करिता बसणारे शिवसेना कार्यकर्ता.

श्री.वर्धराज पिल्ले (शिवसेना उपजिल्हा प्रमुख)सौ.शुभांगी घोगले (शिवसेना उपजिल्हा प्रमुख)

सौ.करुणा आष्टनकर (नगराध्यक्षा नगर परिषद कन्हान)श्री.डायनल शेंडे (उपाध्यक्ष नगर परिषद कन्हान)

श्री.अनिल ठाकरे (प्रभाग क्र.७ नगरसेवक न. प. कन्हान)श्री.रवींद्र (छोटू) राणे  (शिवसेना कन्हान शहर प्रमुख)

सौ.मनीषा चिखले (शिवसेना कन्हान शहर प्रमुख)

श्री.चिंटू वाकुडकर श्री.हरीश तिडके श्री.अजय चव्हाण श्री.सुनील पिल्ले श्री.महेंद्र भुरे श्री.रुपेश सातपुते श्री.इशू गुप्ता श्री.जुबेर खान श्री.अनिकेत उपासे श्री.शाहरुख खान श्री.प्रदीप गायकवाड इत्यादी शिवसेना कार्यकर्ते प्रमुख साखळी उपोषणा अग्रेसर होते.

 

 

 

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!