पारशिवनी

दुहेरी अपघातात एका पोलीसाचा मृत्यु , तर सात अन्य घायल

दुहेरी अपघातात एका पोलीसाचा मृत्यु , तर सात अन्य घायल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – तालुक्यातील आमडी फाटा पारशिवनी रोडवर सुतगिरणी नयाकुंड जवळ एका ट्रक व कार अपघात झाल्याने पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहचुन काही सामाजिक कार्यकर्त्यासह कार मध्ये फसलेल्या चालकास बाहेर काढुन वाहतुक सुरळित करित असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या सिप्ट कार ने धडक मारून पोलीस हेड कॉन्स्टेबल सह आठ लोकांना घायल केले. यात पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंता शेरेकर याचा उपचारा दरम्यान पारशिवनी रूग्णालयात मुत्यृ झाला तर सात जख्मी झाल्याने आरोपी कार चालकास अटक करण्यात आली आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.२३ नोंहेबर ला रात्री ८.३० वाजता आमडी फाटा ते पारशिवनी रोड वरील सुतगिरणी नया कुंड जवळ ट्रक व कार चा अपघात झाल्याने पारशिवनी पोलीस घटनास़्थळी पोहचुन कार मध्ये फसलेला चालक विक्रमसिंह बैस यास काढुन खोंबळलेली वाहतुक सुरळीत करित असतांना आमडी फाटा कडुन येणाऱ्या स्विप्ट कार क्रमांक एम एच ४० के एच ६३९३ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन तेथील पोलीस हेड कॉन्स्टेबल सह आठ लोकांना धडक मारल्याने झालेल्या दुहेरी अपघातात हेड कॉन्स्टेबल जयंता विष्णुजी शेरेकर वय ४२ वर्ष राह.येरखेडा कामठी याचा पारशिवनी रूग्णालयात उपचारा दरम्यान मुत्य झाला असुन अन्य सात जख्मी झाले. यात चंद्रप्रकाश टेकाड़े (३२) सुतगिरनी नयाकुंड, अमोल कनोजे (३०) पारशिवनी, विक्रमसिंग बैस (४५) नया कुंड, आकाश कोलांडे (२५) मेहंदी, संदीप तिजारे (३५ ) मेहंदी, गौरव पनवेलकर (३२) पारशिवनी, सागर सायरे (३८) पारशिवनी हे घायल झाले असुन तीन गंभीर जख्मी चा कामठी व नागपुर येथे उपचार सुरू आहे. पारशिवनी पोलीसांनी आरोपी स्विप्ट कार चालक रोशन पाटील (३२) राह. खापरखेडा यास गुरूवार (दि.२४) ला अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे .

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!