चंद्रपूर

नांन्होरी ग्रामपचायतच्या नालीचे बांधकाम अर्धवट.

नांन्होरी ग्रामपचायतच्या नालीचे बांधकाम अर्धवट.

नांन्होरी गावातील सुभाष चौक ते आंबेडकर चौक येथे दोन्ही बाजूने बंधिस्त नालीचे बांधकाम करण्यासाठी आमदार किर्तिकुमार भांगडीया यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या नालीचे काम अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. गावातील सुजाण नागरिकांनी अर्धवट अवस्थेत असलेले काम पुर्ण करण्यात यावे यासाठी ग्रामपचायत येथे विंनती अर्ज दाखल केले. परंतु नालीचे बांधकाम आजतागात पूर्ण झालेले दिसून येत नाही.
सदर बांधकाम करतांना बंधिस्त नाली असायला हवी परंतु तेथे असे काहीच दिसत नाही. यावरून काम पूर्ण झाल्याचे दाखवून कामाचा आराखडा बोर्ड तयार करून लावण्यात आलेला आहे. शासन या बाबीची दाखल का घेत नाही असा प्रश्न आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष दिलीप प्रधान यांनी उपस्थित केला आहे आणि ग्रामपंचायत येथे सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य अशा अर्धवट कामांना दुजोरा का देतात असा प्रश्न गावातील जनमानसांत निर्माण झालेला आहे

 

नगर परिषद ब्रम्हपुरी चे नगर सेवक अड. दीपक शुकला यांनी आज दिनाक ४ आगस्ट ला नगर ब्रम्हपुरी च्या बांधकाम विभागाच्या दारासमोर नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्यासाठी ठीय्या आंदोलन केले.नंतर मात्र त्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्याने आदोलन समाप्त करण्यात आले

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!