Tathagat Vidhyalay-Karbhand
नागपूरमहाराष्ट्र

नागपूर मनोरूग्णालयामध्ये निराधार व मनोरूग्णांचे लसीकरण संपन्न मंगळवारी म.न.पा. झोन अंतर्गत २१८ लाभार्थींचे लसीकरण.

नागपूर मनोरूग्णालयामध्ये निराधार व मनोरूग्णांचे लसीकरण संपन्न
मंगळवारी म.न.पा. झोन अंतर्गत २१८ लाभार्थींचे लसीकरण.

नागपूर, ता.१८ : मंगळवारी झोन कार्यालय, नागपूर महानगरपालिका अंतर्गत गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र म.न.पा. नागपूर चे वैद्यकीय पथक तसेच नागपूर मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्या संयूक्त सहकार्याने ७५ पूरूष व १४३ स्त्री अश्या एकूण २१८ निराधार व मनोरूग्ण लाभार्थींना कोव्हिडशिल्ड लसीकरणाचा प्रथम डोज देण्यात आला. सदर कार्यासाठी नागपूर महानगरपालिका चे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी वैद्यकीय पथकाचे मार्गदर्शन केले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी झोनल वैद्यकीय अधिका-यांना सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने हा शिबिर घेण्यात आला.
एकाच दिवशी पूर्ण झालेल्या या कोव्हिड लसीकरणाचा 218 लाभार्थींनी लाभ घेतलेला असून सर्वांनी या विशेष मोहीमेबद्दल आभार व्यक्त केले. या लसीकरण मोहीमेसाठी मंगळवारी झोनचे सहाय्यक आयुक्त विजय हुमणे व झोनल वैद्यकीय अधिकारी श्री अतिक उर रहेमान खान, डॉ. श्रीकांत करोडे, डॉ. जोश्ना गलाट, डॉ. आशिष कुथे, डॉ. पंकज बागडे, डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. अमोल चव्हाण (मनोचिकित्सक), डॉ. सुर्यकांत ढेंगरे, श्रीमती रिना खुरपुडी, श्रीमती श्रध्दा यादव, श्रीमती ज्योती फिस्के, श्रीमती अनघा राजे, श्रीमती मधुमती मंथनवार, राजेश खरे, अलका महाजन, श्रीमती मानवटकर, कुणाल बिरहा, केवल शेंडे, धर्मेंद्र मोरे, गुंजन शेंडे, आर्यन बिनकर, साक्षी ठाकरे यांनी अथक परीश्रम घेतले.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!