नान्होरी ग्रामपंचायत निधीतून होणाऱ्या स्मशानभूमीत जनसुविधा कामात निक्रुष्टता

नान्होरी ग्रामपंचायत निधीतून होणाऱ्या स्मशानभूमीत जनसुविधा कामात निक्रुष्टता
ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी येथील जनसुविधा कामाला वेग आला असे निदर्शनास येत होते मात्र घडले काही वेगळेच. नान्होरी येथील स्मशानभूमीत तारेचे कुंपण घालून व मुख्य प्रवेशद्वार येथे गेट लावण्याचे काम केले आहे.
त्यातील अंदाजपत्रकीय किंमत ही ३५०००० आहे. दिलेल्या कंत्राट रक्कमेनूसार काम झालेले नसून निकृष्ट दर्जाचे काम दिसून येत आहे.
आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप प्रधान यांनी स्मशानभूमीची पाहणी केली असता असे आढळून आले व त्यांनी नान्होरी सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक यांनी केलेले जनसुविधा काम निक्रुष्ट असून आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने वापर झालेला नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याचे नान्होरी येथील
जनमानसात चर्चेला ऊत आला आहे. निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हायला हवा असे दिलीप प्रधान यांचे आरोप आहे तर अशाप्रकारच्या कामात लिप्त असलेल्या सर्व दोषिवर शासनाने योग्य कार्यवाही करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.