पारशिवनी

न्यु गोंडेगाव येथे विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव थाटात संपन्न

धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे आयोजन

न्यु गोंडेगाव येथे विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव थाटात संपन्न

धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील न्यु गोंडेगाव येथे धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे घटस्थापना दिवशी विधिवत पूजा अर्चना करून घटाची स्थापना आणि देवी मुर्तीची स्थापना करुन नवरात्र महोत्सवाची सुरवात करण्यात आली असुन मंडळात विविध भजन कीर्तन , सांस्कृतिक कार्यक्रमा सह विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव थाटात संपन्न करण्यात आले .

सोमवार दि.२६ सप्टेंबर ला न्यु गोंडेगाव येथे धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे मंडळात विधिवत पूजा अर्चना करून घटाची स्थापना आणि देवी मुर्तीची स्थापना करुन नवरात्र महोत्सवाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर दररोज सकाळ , सायंकाळ आरती , दुपारी यसंबा , गोंडेगाव द्वारे भजन कीर्तन , सांस्कृतिक कार्यक्रम , गरबा डांस , सह अनेक विविध कार्यक्रम आयोजित केले . शुक्रवार दि ७ आॅंक्टोंबर ला महाप्रसाद वितरण करण्यात आले . शनिवार दि.९ आॅंक्टोंबर ला घट विर्सजन आणि देवी मुर्तीच्या विर्सजना ने नवरात्र महोत्सव थाटात संपन्न करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गोंडेगाव ग्रामपंचायत सरपंच मा. नितेश राऊत , उपसरपंच मा.सुभाष डोकरीमारे , धन्नोत्री महिला ग्रामसंघ नवदुर्गा उत्सव मंडळ च्या अध्यक्षा सौ अर्चना गजभिए , सी.आर.पी.सौ.आरती वगारे , सचिव सौ.मंजु लक्षणे , कोषाध्यक्ष सौ रुपाली फरकाडे , लिपीका सौ सरिता लसुंते , सह आदि नागरिकांनी व महिलांनी उपस्थित राहुन सहकार्य केले

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!