Tathagat Vidhyalay-Karbhand
पारशिवनी

पर्यायी सिंचनाची व्यवस्था म्हणून आमडी हिवरी शिवारात वनराई बंधारा निर्मिती

पारशिवनी:- आमडी हिवरी शिवारात वनराई बंधारा निर्मिती…

दिनांक 18/12/2020 रोजी मौजा हीवरी ग्रामपंचायत आमडी शिवारातील नाल्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ. ए.डी. गच्चे यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी कन्हान, श्री. जी.बी. वाघ

यांच्या देखरेखीत मध्ये हिवरी येथील शेतकरी व नागरिकांच्या मदतीने श्रमदानातून गाव शिवारातील जिवंत नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.

या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर नाल्यातून वाहून जाणारे पाणी पारंपारिक पद्धतीने अडवून ते पाणी जमिनीत जिरविण्यासाठी मदत होईल.

वनराई बंधाऱ्याच्या साठलेल्या पाण्यामुळे आसपासच्या शिवारातील भूजल पातळी वाढून तलाव विहिरीत जल पातळी वाढण्यास मदत होईल, आणि सदर नाल्या लगत असलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी सिंचनाची व्यवस्था होईल या हेतूने बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.

यावेळी आमडी हिवरी च्या सरपंच सौ. शुभांगी ताई राजू भोस्कर,

पारशिवनी शिवसेना तालुका प्रमुख श्री. राजू भाऊ भोस्कर,

माजी सरपंच श्री जिवलग चव्हाण,

कृषी पर्यवेक्षक कु. संकपाळ मॅडम, कृषी सहाय्यक कु. राठोड, कु. ढंगारे, कृषी मित्र श्री झाडे भाऊ, रोजगार सेवक सत्यशील चव्हाण, व गावकरी रत्नमाला ठोके ,रुक्माबाई दहाडे, मंदाबाई चव्हाण, शिल्पा बाई चव्हाण, शालू केळकर, रत्नमाला चव्हाण, यशोदाबाई घोडमारे,रोशन नवधिंगे , प्रतीक बुराई, अभिषेक वाघमारे,रजत वासे इत्यादी गावातील शेतकरी आवर्जून उपस्थित होते..

प्रतिनिधी:-  भारत पगारे

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!