ब्रह्मपुरीब्रेकिंग न्यूज

पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार.! आरोपी अटकेत

पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार.! आरोपी अटकेत

ब्रम्हपुरी- तालुक्यातील वांद्रा गावामध्ये  एक धक्कादायक घटना समोर आली असून पाच वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला आहे.या घटनेमुळे वांद्रा गावच नाही तर संपुर्ण ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर अशाप्रकारचं किळसवाणं आणि संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. मेंडकी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आरोपीचे नाव युवराज बळीराम  मेश्राम वय वर्षे ३० असे आहे.

सविस्तर वृत्त असे की पाच वर्षीय चिमुकली हि गुरुकुंज आश्रम वांद्रा येथील प्रांगणात  असलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली काही चिमुकल्या मैंत्रिणी सोबत खेळत होती. खेळत असताना युवराज बळीराम मेश्राम नामक वासनाधिन झालेल्या नराधमाने नासमज असलेल्या चिमुकलीला पकडले. व कुकर्म करण्यासाठीं नेत असताना तिच्या सोबत खेळत असलेल्या चिमुरड्या मैंत्रिनी ने पळ काढला. व युवराज मेश्राम नामक नराधमाने  चिमुकली वर अत्याचार केला. अत्याचार झाल्यानंतर गुरूकुंज आश्रमालगत असलेल्या पानटपरीवर पिडीत चिमुकीलीचे  वडिल होते.

चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने वडिल चिमुकलीकडे धावत गेले. नराधम तिथेच चिमुकली सोबत  होता. संबधित घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील भाऊराव पाल यांना देण्यात आली. लगेच मेंडकी पोलिसाना पाचारण करून आरोपीला अटक करण्यात आली. व चिमुरडीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. व तपासाअंती  युवराज नामक नराधमाने अत्याचार केला हे सिद्ध झाले व आरोपीला अटक करून अपराध क्र.४३७, कलम ३७६ AB IPC कलम ६ आणि १०, पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेचा पुढील तपास पोलीस  उपनिरीक्षक स्वाती फुलेकर ह्या करीत आहेत.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!