Tathagat Vidhyalay-Karbhand
पारशिवनीमहाराष्ट्र

पारशिवनी तालुक्यातील खळबळजन घटना, मायक्रो फायनान्स गटाच्या नावावरून “महिलेनी केला पैशाचा व दागिन्याचा घोटाळा”

पारशिवनी तालुक्यातील खळबळजन घटना, मायक्रो फायनान्स गटाच्या नावावरून “महिलेनी केला पैशाचा व दागिन्याचा घोटाळा”

पारशिवनी:- मायक्रो फायनान्स गटाच्या नावावरून… गटातील महिलेनी केले  गटातील महिलांचा विश्वासघात. गटातील महिलेनी, गटातील सर्व बायांचे सहया करून घेतले व त्यावर पैसे उचलून घेतल्याची खळबळ जनक घटना पारशिवनी इथे घडली आहे. हि घटना माहिती होताच गटातील महिलांनी पारशिवनी पोलीस ठाणा अंतर्गत येथे गुन्हा दाखल केले आहे असे सांगण्यात येत आहे.  गुन्हा दाखल असलेली महिला सौ. पौर्णिमा दिनेश धुर्वे हे नाव सांगितले जात आहे. गटातील महिलांना असे सांगितले कि मला पैस्याची गरज आहे व १०% व्याज देणार व स्वताच्या मुलाची शपथ घेउन विनवणी केली व मायक्रो फायनान्स समूहातील महिलांना विश्वासात घेऊन  पैस्याची लुबाडणी केली. तसेच वेगवेगळ्या मायक्रो फायनान्स बॅंक च्या माध्यमातून गट तयार करून पैसे लुबाडले., जसे कि स्पंधन,आशीर्वाद,sks, बंधन, उत्कर्ष, इसाफ, फ्युजन,फिनिकेअर,इत्यादी , मायक्रो फायनान्स बॅंक कडून गटाच्या माध्यमातून पैसे उचलून व गटातील बायांना खोट सांगून १०% व्याज देणार असे सांगून पैसे घेतले.

असेही सांगण्यात आले आहे कि जवळपास ४० ते ५० पन्नास लाखाची रक्कम आहे. जि वेगवेगळ्या गटाच्या माद्यमातून उचलण्यात आली. तसेच काही महिलांना विश्वासात घेऊन सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच जवळपास  १ ते १.५ किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचे साग्न्यात येत आहे. खारी विभागातील महिलांचे व इतर गटातील महिलाचा नुकसान झाल्याने त्रस्त आहेत. त्रस्त महिलांनी आरोपी महिला विरुद्ध पोलीस विभागात गुन्हा दाखल केला. आरोपी महिलानि संबंधित गटाच्या दस्तावेज सुद्धा इतर महिलांकडे पुरावे किवा लिखित माहिती म्हणून ठेवलेले नाही, असे देखील निदर्शनात आले आहे. कोरोना सारख्या परिस्तिथी मध्ये व लॉकडाऊन ची अवस्था लक्षात घेता खूप मोठा गुन्हा आहे असे बोलण्यात काहीच हर्कत  नाही.

स्थानिक माहिती सुरक्षा समिती द्वारे हि घटना सामोर आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.संतोष वैरागडे तसेच पारशिवनी पोलीस अंतर्गत करण्यात येत आहे.

प्रतिनिधी:- प्रा.निता ईटनकर,पारशिवनी

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!