Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरीचा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य सुवर्ण पदकाचा मानकरी

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ ला नववा दीक्षांत समारंभ दि.१२/१०/२०२१ ला महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

ब्रम्हपुरी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरीचा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य सुवर्ण पदकाचा मानकरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ब्रम्हपुरी येथिल एम. ए. आंबेडकर विचारधारा या विषयाकरिता कू. योगिता पिसाराम रामटेके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कू स्निग्धा क्रिष्णा खोब्रागडे द्वितीय तर अमित प्रल्हाद वाकडे यांनी अनुक्रमांक गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकाविला.

एम. ए. पालि व प्राकृत या विषयात दिलीप केशवराव बरसागडे यांनी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तसेच महामहिम राज्यपाल महाराष्ट्रराज्य सुवर्ण पदक एम. ए. अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करुन गौरविण्यात आले. कू.पूजा दिलीप पिल्लेवान द्वितीय आणि विद्यानंद कृष्णाजी सूर्यवंशी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

एम. ए. इंग्रजी विषयामध्ये तृतीय क्रमांक कू. स्नेहा कृष्णराव तुमाने आणि एम. ए. अर्थशास्त्र विषयामध्ये सुनिल गोवर्धन पाटिल यांनी गुणवत्ता यादीत तृतीय येण्याचा मान मिळविल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मारोतरावजी कांबळे. उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेश कांबळे. सचिव प्रा. डॉ. देवेश कांबळे. प्राचार्य डॉ. अजिझुल हक . सौ. रिमा कांबळे. प्रा डॉ स्निग्धा कांबळे तसेच समस्त प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
3 सुवर्ण पदके आणि 8 मेरीट मिळवून विद्यार्थांनी महाविद्यायाची परंपरा कायम ठेवली.

 

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!