चंद्रपूरब्रह्मपुरी

ब्रम्हपुरी तालुक्यातील शेती पाण्याखाली

शासनाने पुढील काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता उपाययोजना करणे अत्यावश्यक

ब्रम्हपुरी तालुक्यातील शेती पाण्याखाली

(शासनाने पुढील काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता उपाययोजना करणे अत्यावश्यक)

ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सतत पाऊस पडत असल्याने तसेच नदी नाल्याला पूर आल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती फार मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आलेली आहे.

शेतामध्ये असलेले धान पीक व अन्य पीक पाण्यामध्ये बुडाले आहेत.

या अगोदर जुलै महिन्यामध्ये सतत दहा ते पंधरा दिवस पाऊस आल्यामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली आली व त्यामुळे शेतातील धान पीक वाहून गेले तर मोठ्या प्रमाणात धान सडले त्यामूळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार धान पेरणी करावी लागली व ओला दुष्काळ निर्माण झाला असतानाच पाऊस पुन्हा मोठ्या प्रमाणात येत असल्याने व गोसेखुर्द धरणाचा पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाले तुडुंब भरल्याने शेती पूर्ण पाण्याखाली आलेली असल्याने यावर शासनाने पुढील काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता उपाययोजना करणे अत्यावश्यक झालेले आहे.

ओला दुष्काळ जरी झालेला असला तरी मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे आलेला खर्च व त्यांचा झालेला नुकसान लक्षात घेता शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर केल्या जातो.

 

बरेच तलाठी प्रत्यक्ष बांधावर न जाता कागदावरच अहवाल तयार करत असतात त्यामुळे अनेक शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहतात. त्यामुळे तलाठ्यांना पंचनामा करत असताना प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्व लाभार्थ्यांची नोंद अहवालात करावी अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

प्रतिनिधी_ राहुल भोयर-ब्रम्हपुरी

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!