कन्हाननागपूरपारशिवनीब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज तोतलाडोह धरणाचे 14 व पेच धरणाचे 16 दरवाजे उघडल्याने कन्हान नदी ला पुर

कन्हान नदी पात्रात आणखी वाढ होण्याची शक्यता , पिपरी गावात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता

ब्रेकिंग न्यूज तोतलाडोह धरणाचे 14 व पेच धरणाचे 16 दरवाजे उघडल्याने कन्हान नदी ला पुर

कन्हान नदी पात्रात आणखी वाढ होण्याची शक्यता , पिपरी गावात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता

तहसील प्रशासन , नगर परिषद प्रशासन , पोलीस प्रशासन सर्तक

नदी काठावरील गावांना व नागरिकांना दवंडी फिरवुन सर्तकतेचा ईशारा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – रामटेक तालुक्यातील तोतलाडोह जल विद्युत प्रकल्पाचे सर्व 14 गेट व पारशिवनी तालुक्यातील नवेगांव खैरी पेंच प्रकल्पाचे सर्व 16 गेट आज सकाळ पासुन सुरु असल्याने कन्हान नदी ला पुर आला असुन पिपरी गावात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वाढल्याने कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासन ने गावात दंवडी फिरवुन नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे .

पेच धरण

मध्यप्रदेश सह नागपुर ग्रामीण जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यात दोन ते तीन दिवसा पासुन सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चौराई , तोतलाडोह व पेच धरण‌‌‌ हे 90% चा वर भरले आहे . त्यामुळे चौराई धरणाचे दरवाजे उघडुन तोतलाडोह नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने तोतलाडोह धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने धरणाचे सर्व 14 गेट व नवेगांव खैरी पेंच प्रकल्पाचे सर्व 16 गेट आज दुपारी 2 मीटर ने उघडल्याने कन्हान नदी ला पुर आला असुन पिपरी गावा सह अनेक गावात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वाढल्याने कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासन ने गावात दंवडी फिरवुन नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे .

सध्या च्या परिस्थिति मध्ये नवेगांव खैरी पेंच प्रकल्पात मुसळधार पाऊस सुरु असल्याने यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसुन महसुल यंत्रणे सह सर्व यंत्रणेने सर्तक राहावे व नदी काठावरील नागरिकांनी सर्तक राहावे .
अशी माहिती पेच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सावरकर , कनिष्ठ अभियंता विशाल दुपारी , तहसीलदार प्रशांत सांगडे , सह आदि ने दिली .

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!