Tathagat Vidhyalay-Karbhand
महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज पेंच धरणचे दरवाजे उघडले , पेंच व कन्हान नदी ला पुर , शेतातील पिंकाचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ब्रेकिंग न्यूज पेंच धरणचे दरवाजे उघडले , पेंच व कन्हान नदी ला पुर , शेतातील पिंकाचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

तालुक्यात एकुण ४९९.६७५ मिमी पावसाची नोंद ,

उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केला दौरा

नदी काठावरील गावांना व नागरिकांना दवंडी फिरवुन सर्तकतेचा इशारा

 

कन्हान – मध्यप्रदेश , महाराष्ट्र सह संपुर्ण जिल्ह्यात व तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील पेंच धरणाचे १६ दरवाजे बुधवार ला उघडण्यात आल्याने कन्हान आणि पेंच नद्यांना मोठ्या प्रमाणात पुर आला असुन गावांत पाणी घुसल्याने संपर्क तुटला असुन नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .  त्यामुळे पेंच नदी काठावरील  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नागरिकांनी सूचनांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे कडकडीचे आवाहन रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते व पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे .

मध्यप्रदेश , महाराष्ट्र सह संपुर्ण जिल्ह्यात व तालुक्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरण ९६% टक्के भरल्याने बुधवारी सकाळ पासून धरणाचे १६ दरवाजे उघडुन ०.५ फूट अतिरिक्त पाणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पेंच व कन्हान नदी ला पूर आला असुन सुवर्णधारा , नरहर , बाणेरा , कोलितमारा , टोली , आमगाव , वरडा , जुनी कामठी गाडेघाट , कुंवरा भिवसेन, नयाकुंड , बाखरी , करंभाड , दहेगाव जोशी , सोनेगाव , बिटोली , पिपळा , गरांडा , घोघरा देवस्थान या गावात पुराचे पाणी पुराचे घुसल्याने संपर्क तुटला असुन नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे नदी काठावरील गावांना व नागरिकांना दवंडी द्वारे सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे . अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .

नवेगाव खैरी पेंच धरण परिसरात मंगळवार ला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी धरणाची पाणी पातळी ९८ टक्के इतकी झाल्याने सकाळी ९ वाजता पेंच व कन्हान नदीत ०.३ मीटर ५०६.८४ क्युसेस पाणी सोडण्यात आले.

तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच व कन्हान नदीच्या काठावर वसलेल्या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल बेहाल झाले असुन मंगळवार पर्यंत तालुक्यात एकूण ४९९.६७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे . या मध्ये तालुक्याचा आमडी विभागात सर्वाधिक ६६.९ (५८१.८ मिमी) ,  पारशिवनी विभागात 104.0 (536.3 मिमी) ,  नवेगाव खैरी येथे 145.0 ( 501.1 मिमी ) ,  कन्हान येथे  83.0 ( 379.2 मिमी ) पाऊस झाला . अश्या पारशिवनी तालुक्यात चार ही विभागात सरासरी ९९.७ (४९९.६७५) मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे .नवेगाव खैरी पेंच धरणातील पाणीपातळी कमी न झाल्याने बुधवार ला दुपारी १२ वाजता पासुन ०.५ मीटर ने दरवाजे वर करून ८५६.८० क्युसेस पाण्याचा विसर्ग रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होता.  रात्री ८ नंतर एक फिट पाणी सोडले जात असुन धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे .

अश्या परिस्थिति मध्ये कोणतीही भीती न बाळगता दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे . पेंच नदीवरील घोगरा महादेव पर्यटनस्थळ आणि पेंच नदीतील पारशिवनी जवळील कुंवरा भिवसेन देवस्थान , घोगरा महादेव तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ पेंच जलाशय पुरामुळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत . अशी माहिती अधिकार्यांनी दिली.

पुरांमुळे झालेल्या परिस्थिति वर पारशिवनी पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे , कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , गटविकास अधिकारी अशोक जाधव , मंडळ अधिकारी , पटवारी , कोतवाल , पोलीस पाटील आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष ठेवून आहेत .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!