Tathagat Vidhyalay-Karbhand
ठाणे

भटकत होते दारोदारी! 6 वर्षानंतर परतले आपल्या घरी

मुरबाड तालुक्यातील तरूणाची कौतुकास्पद कामगीरी

भटकत होते दारोदारी! 6 वर्षानंतर परतले आपल्या घरी

मुरबाड तालुक्यातील तरूणाची कौतुकास्पद कामगीरी

मुरबाड. दि.22/08/2022:  मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाणेच्या हद्दीतील मौजे मोरोशी येथे राहणारे श्री.विजय भिमा गोडे यांना मोरोशी बसस्टॉप येथे एक अनोळखी इसम आढळुन आल्याने त्यांनी त्या व्यक्तीची चौकशी केली असता असे आढळुन आले कि तो इसम मध्यप्रदेश मधील सागर जिल्ह्यातील गंभिरीया मकरीया येथील असुन त्यांचे नाव जगन्नाथ चिंतामण अहिरवार आहे असे त्याने सांगीतले असता, विजय गोडे यांनी दि.16/08/2022रोजी सकाळी 11:00 वाजता  तात्काळ टोकावडे पोलिस स्टेशनला संपर्क साधुन टोकावडे पोलीस स्टेशनला नेले असता,त्यानंतर मध्यप्रदेश पोलीस कंट्रोल ला संपर्क करून लोकल पो.स्टे.पद्माकर पोस्टे याच्याशी संपर्क साधुन त्याचा मोबाइल नंबर प्राप्त केला.

त्याना माहिती देऊन सदर इसमाचा मुलगा,जावई व चुलत भाऊ यांना बोलावणयात आले व त्यांच्याकडे चौकशी केली असता,सदरील व्यक्ती माझे वडील असुन गेली 6वर्षा पासुन घरातुन निघुन गेला होता, व तो मानसीक रूग्ण आहे .त्यांना कुठलीही गोष्ट लक्षात राहत नाही असे सांगण्यात आले.व दि 21/08/2022 रोजी सदर व्यक्तीचा मुलगा लक्ष्मण जगन्नाथ अहिवार वय 18 रा.गंभीरिया मकरीया जिल्हा सागर राज्य मध्यप्रदेश यांचेया ताब्यात देण्यात आले.

तेव्हा सदरील इसमाच्या मुलाने व भावाने टोकावडे पोलिस स्टेशनचे  पोलिस उपनिरीक्षक श्री.संतोष दराडे सर ,सर्व पोलिस कर्मचारी व मोरोशी येथील विजय भिमा गोडे यांचे हातजोडुन आभार मानले या संपुर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे

प्रतिनिधी रविंद्र मराडे

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!