Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

भारतीय कम्युनिस्ट पार्टी चंद्रपुर जिल्ह्यचे त्रैवाषिक अधिवेशन थाटात संपन्न

भारतीय कम्युनिस्ट पार्टी चंद्रपुर जिल्ह्यचे त्रैवाषिक अधिवेशन थाटात संपन्न

भारतीय कम्युनिस्ट पार्टी चंद्रपुरचे त्रैवाषिक अधिवेशन  21 आॅगस्ट 2022 ला स्थानिक नागाचारी महाराज सभागृहात आदिलोक  काॅ. डॉ. महेश कोपुलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. काॅ. श्यामजी काळे  राज्य सचिव मंडळ सदस्य भाकप नागपूर यांनी अधिवेशनाचे रितसर उद्घाटन केले.

प्रथम पक्षाचा लाल ध्वज वरिष्ठ काॅ. डॉ. रेड्डी यांच्या  हस्ते फडकविण्यात आले.

काॅ. प्रा. नामदेव कन्नाके जिल्हा सचिव यानी पार्टीचे तिन वर्षाचे वार्षिक अहवाल सादर केले.

यावर पक्ष प्रतिनिधि कॉ. विनोद झोडगे, कॉ दिलीप बर्गी,कॉ प्रदीप चिताडे,कॉ मीना चौधरी,कॉ प्रकाश रेड्डी व कॉ रवींद्र उमाटे,राजू गईनवार,कॉ विश्वनाथ बुरांडे यांनी अहवालावर चर्चा केले.

काॅ शयामजी काळे राज्य सचिव मंडळ सदक्ष यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या जनविरोधी धोरणाच्या भूमिकेवर सडकून टीका करत या भांडवलदारी व धर्मांध सरकारला सत्तेपासून खाली खिचण्यासाठी गावागावात पक्ष शाखा निर्माण करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मजबूत करण्याचे आवाहन केले.

काॅ डॉ महेश कोपुलवार  यांनी 18 ते 20 सप्टेंबर 2022 रोजी भाकप चे  राज्य अधिवेशन अमरावती येथे होत असल्याची ची माहीती देऊन ,पक्ष्याच्या 98 वर्षाचा त्याग,संघर्षाची भूमिका विशद करत धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी पार्टीला मजबूत करण्याचे सांगितले.

पुढील काळात जिल्ह्यातील 15 ही तालुक्यात पक्षाच्या शाखा निर्माण करून ,पार्टीला मजबूत करण्यासाठी कॉ प्रा नामदेव कंनाके, कॉ विनोद झोडगे,कॉ राजू गईनवार,कॉ प्रकाश रेड्डी,रवींद्र उमाटे, कॉ श्रीधर वाढई, कॉ कॅप्टन,कॉ ललिता कोवे व कॉ डॉ रेड्डी यांना जबाबदारी देऊन,अमरावती येथे होणाऱ्या राज्य अधिवेशन करिता 11 प्रतिनिधी ची निवड करण्यात आली आहे.

अधिवेशनाचे संचालन कॉ रवींद्र उमाटे तर आभार कॉ राजू गईनवार यांनी मानले.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!