चंद्रपूर

महसूल विभाग वाळू माफियांच्या दावणीला

महसूल विभाग वाळू माफियांच्या दावणीला…!

सुपर एंट्री ठरवणार वाळू उत्खनणं कधी व कसे

ब्रम्हपुरी – दहा जून ही वाळघाटामधून वाळू उपसा करण्याची अंतिम तारीख  मात्र वाळू उत्खननाची परवानगी नसतांना तालुक्यातील वैनगंगा नदी पात्रातून वीना रॉयल्टी  रॉयल्टी च्या नावाने होणाऱ्या वाळू चोरी नंतरही दिलेल्या पन्नास ते साठ हजार सुपरएंट्री च्या नावाने बिनधास्त वाळू तस्करी सुरु असून तालुका महसूल विभाग वाळू माफियांच्या दावणीला बांधले गेले असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी यांनी वाळू घाटाचे लिलाव करतांना  बरीच मोठी अटी शर्ती घालून दिलेल्या असून या अटी शर्तीला तिलांजली देतं तालुक्यातील वाळूघाट मालकांनी  तालुका महसूल विभागाला  गप्प करून तालुक्यातील कोरोडो रुपयाच्या रस्त्याची दैनावस्था केलि तर वाट्टेल तशा पद्धतीने तालुक्यातून  टिप्परच्या साहाय्याने वाळू तस्करीचा खेळ खेळून करोडोची माया गोळा केली . ट्रॅक्टर धारक सुद्धा यात मागे न राहता गंदा है पर धंदा है या म्हणी नुसार भरधावं वाहन चालवून सामान्य नागरिकांवर दादागिरी करीत वाळू चोरीचा धंदा दिवस रात्र करतांना आढळून येत आहेत.

सत्ताधारी व विरोधातील लहान कार्यकर्त्या पासून मोठे राजकिय पुढारी आणि प्रशासनातील वरिष्ठ ते कनिष्ठ सर्व वाळू तस्करीतुन मिळणाऱ्या डल्ल्या साठी एकवटल्याने तालुक्यात वाळू तस्करी करीता विरोधी न ऊरल्याने तालुक्यात वाळूची अवैध तस्करी उघड पने पहायला मिळत आहे.

सामान्य नागरिकांना तक्रार केली तरी कारवाही होत नसल्याने तमाशा पाहण्या पलीकडे काहीचं करता येणार नाही अशी व्यवस्था आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार वृत्तपत्रात बातम्या टाकून जिल्हा, तालुका प्रशासनाची बदनामी करणार व उघडं पाडणार, मात्र ‘जब सैंया भये कोतवाल तो डर काहे का’ याच अविर्भावात वाळू माफियांनी तालुक्यात सर्वत्र वाळू तस्करीचा थैमान घालत, महसूल विभागाला आपल्या दावणीला बांधून, कुणालाही न जुमानता उघड पने वाळू तस्करीच्या माध्यमातून सामान्य जनतेला कोन क्या करेगा असे आव्हान देतं असल्याचे संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.

 

 

(तस्कर छातीठोकपणे सबकुथ मॅनेज असल्याचे बोलत आहेत.

 

मागील चार पाच महिन्यांपासून तालुक्यात वाळूची तस्करी जोरात सुरू आहे. त्यामुळे रेती तस्कर चांगले मालामाल झाले असून, त्यांच्याकडील वाहनांची संख्या दुप्पट झाली आहे. तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने वाळूची तस्करी अविरोध सुरळीत सुरू असून तस्कर छातीठोकपणे सबकुथ मॅनेज असल्याचे बोलत आहेत.)

 

प्रतिनिधी :- राहुल भोयर, ब्रम्हपुरी-चंद्रपूर

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!