Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

‘माहेर’ महिला मेळाव्याला उत्सपुर्त प्रतिसाद

“माहेर” महिला मेळाव्याला उत्सपुर्त प्रतिसाद

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – माहेर महिला मंच द्वारे भव्य महिला मेळावा शनिवार(ता.01) ला कुलदीप मंगल कार्यालय , कन्हान येथे आयोजित करण्यात आले होते.

देशाच्या प्रगतीच्या वाटेवर महिलांचे राजकीय , सामजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम योगदान व त्यांच्या या कार्यास नमन म्हणून सावित्री बाई फुले व दुर्गा देवी यांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पण , पूजन व दीप प्रज्वलीत करून अतिशय सुंदर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . माहेर महिला मंच चे आयोजन अध्यक्षा सौ.रीता ताई बर्वे व उपाध्यक्षा सौ. सुनिता ताई मानकर यांनी केली.

नवरात्रोत्सव निमित्त आरोग्य विभागा द्वारे राबविण्यात आलेली माता सुरक्षित तर घर सुरक्षित या शिबिरा बद्दलची माहिती सर्व माता-भगिनींना या मंचाच्या माध्यमातून देण्यात आले तसेच व्यास पिठाला लाभलेली पाहुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.रश्मी ताई बर्वे अध्यक्षा , नागपूर जिल्हा परिषद, श्री.एस.क्यू.जमा माजी आमदार , नरेशजी बर्वे अध्यक्ष राष्ट्रीय कोयला मजदुर संघ तथा उपाध्यक्ष , नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी सौ.तक्षशिला ताई वाघधरे महासचिव महा.प्रदेश काँग्रेस कमेटी , कू.कुंदा ताई राऊत अध्यक्षा नागपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमेटी , सौ.गुंफाताई तिडके नगरसेविका न.प.कन्हान , कू.रेखा ताई टोहने नगरसेविका न प. कन्हान , पुष्पा कावडकर नगरसेविका न.प.कन्हान , सौ. मिना ताई ठाकूर आदी मान्यवरांचा उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी मीना वाटकर , सविता बावणे , वनिता मसार , छाया रंग , पुष्पा बावणे , सरोज राऊत , प्रतिभा बावनकुळे , रंजीता सूर्यवंशी , कल्पना बागडे , सुमन भिवगडे , प्रतिभा घारपींडे , वंदना बागडे , पूनम माहुल , मीना पुणेकर , माया वाघमारे , पुष्पा खंगारे , अश्विनी जैन , सोनाली मसार , कल्पना शिरपूरकर , कुसुम वडेज्ञ , सुनंदा कठाणे , राजकन्या यादव , मंदा बागडे , आदी माता भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कार्यक्रमा द्वारे महिलांन मध्ये नविन स्फुर्ती व आत्मविश्वास वाढला . सर्व महिलांनी या माहेर महिला मंच चे आभार मानले.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!