Tathagat Vidhyalay-Karbhand
ठाणे

मुरबाड, सरळगाव, धसई,टोकावडे मध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरबाड, सरळगाव, धसई,टोकावडे मध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मुरबाड:-उत्तरप्रदेश मधिल लखिमपुर खेरी येथील कृषी कायद्याच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालुन निर्घृण पणे चिरडून टाकणाऱ्या भाजपा केंद्रीय मंत्र्यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट् बंदची हाक दिली होती त्या प्रमाणे मुरबाड शहर तसेच तालुक्यातील सरळगाव,धसई, टोकावडे, शिवळे, म्हसा बाजरपेतील व्यापारी वर्गाने बंदला उस्फुर्त प्रतिसाद देऊन महाविकास आघाडीला सहकार्य केल या वेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेतील दुकानदारांना शांत पणे बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले असता संपूर्ण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेत कडकडीत बंद पाळून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी मुरबाड तसेच टोकावडे पोलिसांन कडुन उत्तम प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शेतकर्यांना पाठींबा दर्शविण्यासाठी पुकारलेला बंद शांततेत पार पडला
यावेळी टोकावडे पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रतिनिधी:- राजेश भांगे (मुरबाड/ठाणे)

 

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!