Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरी

मुरूम वाहतुकीतील ट्रॅक्टरची ट्रॅव्हल्स ला धडक देत अपघात

मुरूम वाहतुकीतील ट्रॅक्टरची ट्रॅव्हल्स ला धडक देत अपघात

ब्रम्हपुरी:-  देसाईगंज वडसा वरून प्रवासी ट्रॅव्हल्स ब्रह्मपुरी मार्गे नागपुरला जात असताना ब्रम्हपुरी वरुण देसाईगंज वडसा मार्गाने वीना नंबर असलेला  ट्रैक्टर  लाल  मुरूम  भरून   टिळक नगर येथील लोकमान्य टिळक शाळे जवळील गोलाकारात वळण ( सर्कल ) व कॉर्नर रोड लागून असलेल्या मोठ्या उतारावर  4:30 वाजताच्या दरम्यान  सुसाट वेगाने जात असताना वडसा वरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सला खूप मोठ्या प्रमाणात एका बाजूने चिरत नेले व त्या ट्रॅक्टरचा लोखंडी रॉड तुटून सदर ट्रॅव्हल्स मध्ये फसून आहे.

सदरहू मुरूम भरून असलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आडव्या स्थितीत पलटला असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला .

यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तर यापूर्वीही याच ठिकाणी लोखंडी रॉड घेऊन पिंपळ गावाकडे जाणारा ट्रॅक्टर उतारावरून तोल न सांभाळल्याने पलटला होता. त्यावेळीं तिथेच उपस्थित असलेल्या पोलिस (psi) कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर पलटला असता ड्रायव्हरच्या मानगुटीवर आलेले लोखंडी रॉड दोरीने बांधलेले असल्याने वेळीच कापल्याने ड्रायव्हरचे प्राण वाचले होते. मात्र या अपघाताची नोंद पोलीस डायरीमध्ये झाली नसल्याचे परिसरात बोलल्या जात आहे.

ब्रम्हपुरीत खुप मोठ्या प्रमाणात मुरुमाची तस्करी भर दिवसा होत असून मुरूम तस्कर मोठ्या वेगाने ट्रॅक्टर चालवत असतात.

बऱ्याच वृत्तपत्रात  वाहनांच्या वेगावर नियंत्रण यावे म्हणुन बातम्याही प्रकाशित झाल्या मात्र या मुरूम तस्करीतील वाहनांच्या वेगावर आजपर्यंत संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसल्यानेच असे अपघाताचे प्रकार घडत असून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडविल्या जात असल्याची खमंग चर्चा जनमानसात सुरू आहे.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!