कन्हानपारशिवनी

येसंबा ग्रामपंचायत येथे इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांची संयुक्त जयंती थाटात साजरी

येसंबा ग्रामपंचायत येथे इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांची संयुक्त जयंती थाटात साजरी

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वतंत्र भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांची संयुक्त जयंती थाटात साजरी करण्यात आली .कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सौ संजीवनी महल्ले व मा.कुमार गडे यांच्या हस्ते पंतप्रधान इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली . यावेळी सरपंच धनराज हारोडे यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवना विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य , सदस्यांनी , अधिकार्यांनी , कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .

या प्रसंगी मा. धनराज हारोडे ,मा. पंकज चकोले , मा. बालचंद धुर्वे , मा.विठोबा कडु , संतोष सोनवाणे , संजय गजभिये , सह आदि नागरिक उपस्थित होते.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!