नागपूरपारशिवनीमहाराष्ट्ररामटेक

रामटेक व कन्हान नवीन एमआयडीसी बाबत 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे उद्योगमंत्री यांचे विभागाला आदेश

उद्योगमंत्री व आमदार आशिषजी जयस्वाल यांची म.औ.वि.म. यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

रामटेक व कन्हान नवीन एमआयडीसी बाबत 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे उद्योगमंत्री यांचे विभागाला आदेश

उद्योगमंत्री व आमदार आशिषजी जयस्वाल यांची म.औ.वि.म. यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

आज दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी मा.ना.श्री.उदयजी सामंत उद्योग मंञी यांच्या दालनात रामटेक व कन्हान(ता. पारशिवनी) येथे नवीन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्याबाबत बैठक पार पडली.या बैठकीत प्रधान सचिव,उद्योग विभाग,सह सचिव,उद्योग विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी,म.औ.वि.म.मुंबई, एम.पटेल प्रादेशिक अधिकारी,म.औ.वि.म.नागपूर उपस्थित होते.

रामटेक व पारशिवनी तालूक्यात जंगल व्याप्त परिसर असल्यामूळे पूर्वीपासूनच उद्योगांना पुरेसा वाव मिळाला नाही.यामूळे औद्योगिक प्रगती झाली नाही.त्या कारणाने बेरोजगारी,लोकांचे रोजगारासाठी पलायन या सर्व प्रश्नांना तोडगा म्हणून नविन औद्योगिक क्षेञ निर्माण करुन तो विकसित करण्याची नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती.त्याच मागणीला धरुन रामटेक विधानसभा क्षेञाचे आमदार अँड.आशिषजी जयस्वाल यांनी प्रचंड पाठपुरावा करुन हा प्रश्न शासन दरबारी लावून ठेवला.मागिल सरकारमध्ये सरकारच्या उदासिन धोरणामूळे व अधिकार्‍यांच्या ईच्छाशक्ती अभावी हा प्रश्न प्रलंबित होता.

बेरोजगारी दूर करण्यासाठी व या भागात औद्योगिक प्रगतीसाठी एम.आय.डी.सी. अत्यंत आवश्यक आहे, अशी भूमिका आमदार जयस्वालजी यांनी मांडली व ते पटवून सांगितले शिवाय या भागात मजूर, कोळसा, मँगॅनीज सारखे खनिज व एम.आय.डी.सी. करिता आवश्यक सर्वच बाबी उपलब्ध असल्याचे सांगितले. रामटेक व कन्हान (ता.पारशिवनी) येथे नवीन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी मा.ना.उदयजी सामंत यांनी तत्वता मान्याता दिली आहे. उदया दि.१६ सप्टेंबर रोज शुक्रवारला औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी वर्ग नविन औद्योगिक क्षेञ विकसीत करण्यासाठी रामटेक व कन्हान (ता.पारशिवनी) येथिल जागेची पाहणी करण्याकरिता येणार आहे.

मागील शासनाने हा प्रस्ताव थंड बसत्यात टाकला होता व प्रस्ताव अव्यवहारिक असल्याचे सांगितले होते. परंतु आमदार आशिषजी जयस्वाल यांच्या मागणीमुळे मा.ना.श्री.उदयजी सामंत,उद्योग मंञी यांनी परत याची शहानिशा करण्यासाठी दोन दिवसात सर्वे करुन संक्षिप्त टिपणी सादर करण्याबाबत प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मुंबई यांना आदेश दिले आहे.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!