Uncategorized

वाघोली शिवारात अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलुप तोडुन केली घरफोडी

वाघोली शिवारात अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलुप तोडुन केली घरफोडी

सोने, चांदीच्या दागिने सह नगदी ४ हजार रूपए असा एकुण १६,७०० रुपयाच्या मुद्देमाल चोरुन आरोपी पसार

फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान  – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १० कि मी अंतरावर असलेल्या वाघोली येथे अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधुन दाराचे कुलुप तोडुन आलमारी तील सोने, चांदीच्या दागिन्यासह नगदी ४ हजार रू. असा एकुण १६,७०० रूपयाचा मुद्देमाल चोरी करून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा सेदाखल करून पुढील तपास सुरू करीत आरोपीचा शोध घेत आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार वाघोली येथील भिमराव धनराज काकडे वय ५२ वर्षे हे बाहेर गावी गेले असतांना (दि.३१) मे २०२२ चे सकाळी ७३० वाजता ते १ जुन चे सकाळी ७ वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधुन घराच्या दाराचे कूलुप तोडून आत प्रवेश करित आलमारीचे लॉक तोडुन लाॅकर मध्ये ठेवलेले ४ ग्रँम सोन्याचे टॉप्स किंमत १०,००० रूपये, कमरपट्टा चांदीचा ४ तोळे किंमत १२०० रूपये, चांदीचे पायपट्या ५ तो़ळे किंमत १५०० रूपये व नगदी ४००० रूपये असा एकुण १६,७०० रूपयाचा मुद्देमाल माल चोरून घरफोडी केल्याने कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी भीमराव काकडे यांच्या तोंडी तक्रारी वरून व पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या आदेशाने अपराध क्रमांक क ३३०२०२२ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून  कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार श्रावणकर हे पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर,कन्हान

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!