Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हान

शेतात असलेल्या वीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला चोरी

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

शेतात असलेल्या वीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला चोरी

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान –  कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाक्या जवळील फिर्यादी यांच्या शेतातील खोली मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने एकुण २०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी नामे उमेश विठ्ठलराव कावळे वय ६२ वर्ष राहणार मित्र विहार नगर खरबी रोड प्लाॅट नं ७३ नागपुर यांची  बोरडा टोल नाका व्हाईट लाॅज जवळ कॅनल ला लगुन पावने पाच एकड शेती आहे . त्या शेती मध्ये धान पिक लावलेले आहे . उमेश कावळे यांनी आपल्या शेतात सामान ठेवण्या क्रिया खोली बनवलेली असुन त्यांचे आठवड्यातुन दोन तीन दिवस येणे जाणे असायचे . रविवार दिनांक २८ आॅगस्ट ला सायंकाळी ५०० वा ते सोमवार दिनांक २९ ला दुपारी ११०० वाजता च्या दरम्यान उमेश कावळे हे शेतामध्ये आले असता त्यांना शेतामध्ये खुल्या जागेत असलेली खोली उघडी दिसली व अंदर जाऊन पाहणी केली असता खोली मध्ये असलेली ५ हचपी हाऊस पावर ची मशीन किंमत १४,००० रु , ४ खत कंचन ची बॅग किंमत ५,४०० रु , व दोन प्लाॅस्टिक चेअर किंमत ६०० रुपए असा एकुण २०,००० हजार रुपयांचा मुद्देमाल माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी उमेश कावळे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!