Tathagat Vidhyalay-Karbhand
महाराष्ट्र

संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न : नाभिक एकता मंच व्दारे आयोजन

संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न : नाभिक एकता मंच व्दारे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान  – नाभिक एकता मंच पारशिवनी तालुका व्दारे श्री संत नगाजी नगर कान्द्री येथे वृक्षरोपण करून मनुष्य जिवनात वृक्षाचे महत्व या विषयी जनजागृती करण्यात आली.

वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोक चळवळ व्हावी, नाभिक एकता मंच पारशिवणी तालुक्याच्या वतीने श्री संत नगाजी नगर कांन्द्री येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात नाभिक समाजाच्या समाज बांधवांनी उस्फुर्त सहभाग घेतला. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जवळच्या नर्सरीतुन विविध प्रकारचे झाडे मागवण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश लक्षणे असुन प्रामुख्याने उपस्थित  शरद वाटकर यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. या वृक्षाना वाऱ्यावर सोडुन न देता निगा राखण्याची ही जवाबदारी स्थानिय पदाधिकारी हयांना देण्यात आली.  कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष सुनील लक्षणे यांनी केले असुन जेष्ठ समाज बांधव दत्तु खडसे , गणेश वाटकर, कृष्णा दहिफळक, रोशन बोरकर, हर्ष वाटकर, मंगेश वाटकर, छत्रपती येस्कर, महिला आघा डीच्या मीनाताई वाटकर, वाटकर काकु, समीर लक्षणे, राहुल साखरकर आदीने कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मौलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाश पंडितकर यांनी तर आभार प्रदर्शन शुभम क्षीरसागर यांनी केले.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!