Tathagat Vidhyalay-Karbhand
ब्रह्मपुरी

सांस्कृतिक व कला क्षेत्र मानधनापासून चरणदास बालपांडे उपेक्षित

सांस्कृतिक व कला क्षेत्र  मानधनापासून चरणदास बालपांडे उपेक्षित!

ब्रह्मपुरी-  कला ही  माणसाला लागलेली देणगी आहे मग ती वादनाची असो गायनाची असो की अभिनयाची. ते त्यांच्या आवडी निवडी त्यांच्या कार्यावर अवलंबून असते. मात्र कित्येकांना ती लहानपणापासूनच अवघत होते आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी बरेच लोक त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. मात्र वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर त्यांच्याजवळ उपजीविकेचे साधन नसतो तरी पण वयाचे बंधन न ठेवता कला क्षेत्रात आपले नाव लौकिक कमावण्यासाठी दिवस-रात्र आजही प्रयत्नशील आहेत. त्यापैकीच एक व्यक्ति म्हणजे ब्रह्मपुरी तालुक्यातील रूई

(विद्यानगर) येथील चरणदास बालपांडे मात्र शासनाच्या योजनेपासून हे वंचित आहेत.वयाच्या 18 व्या वर्षापासून वादन गायन हार्मोनियम नाटकामध्ये अभिनयासोबतच समाज प्रबोधन जनजागृती अशा विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केले आहे.

गेल्या दोन-तीन दशका अगोदर झाडीपट्टीतील मराठी नाटकातील दोनशेहून अधिक विविध नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केले असून सोबतच तबला वादन हार्मोनियम वादन व गायन यासोबतच भजन कीर्तन अशा विविध क्षेत्रात ज्यांनी आजपर्यंत आपले नाव लौकीक केला आहे

त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय महादेवराव बालपांडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते नाटकाकडे वळले त्यामध्ये पूर्व विदर्भातील अनेक नामवंत पुरुष व महिला नाट्यकलाकांरासोबत अभिनय पार्श्वगायन हार्मोनियम वादक तबला वादक गायक म्हणून कार्य केले आहे यामध्ये सिंहाचा छावा रणदुंदुभी डाकू मानसिंग धनुर्धर चक्रव्युह धर्मभास्कर स्वर्गावर स्वारी मानापमान सौभद्र एकच प्याला अशा विविध ऐतिहासिक सामाजिक पौराणिक व देशावर आधारित नाटकात त्यांनी सोबत राहून कार्य केले लहानपणापासून आवड असणाऱ्या ह्या चरणदास बालपांडे यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला आजच्या घडीला चरणदास बालपांडे यांची  वय (५५) असून ही व्यक्ती शासनाच्या सांस्कृतिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कलाकौशल्य दाखवणाऱ्या नाट्यकलावंत यादीत मोडत असून वादक गायक असणारे चरणदास आजही शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानांपासून आजही उपेक्षित असल्याची खंत प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलतांना भावना व्यक्त केली शासनाने त्यांना अनुदान मंजूर करून द्यावा अशी मागणी आता परिसरातील नाट्यप्रेमी कडुन होऊ लागली आहे

प्रतिनिधी:- राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)

 

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!