Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरब्रह्मपुरीमहाराष्ट्र

हळदा येथील डीपी दुरुस्ती करून सुरळीत विद्युत पुरवठा करा:भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन

हळदा येथील डीपी दुरुस्ती करून सुरळीत विद्युत पुरवठा करा:भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन

अनेक शेतकऱ्यांचे शेकडो एकर जमीन वरील  उन्हाळी धानपिक झाले उध्वस्त.शेतकऱ्यानं मध्ये शासन व प्रशासन विरोधात तीव्र असंतोष.

ब्रम्हपुरी -तालुक्यातील हळदा येथील मळघाट डिपी वरील विद्युत समस्या मागील 1 महिन्या पासून सुरू आहे परंतु एम.एस. ई.बी.कार्यालय कडून आतापर्यंत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचे करोडो रुपये उन्हाळी धानपिकांचे पाण्या अभावी उत्पन्न बुडत होते परंतु याकडे विद्युत विभागाचे आवश्यक तेवढे लक्ष केंद्रित होताना दिसत नव्हते . उलट शेतकऱ्यांनी तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यानं सोबत अरेरावी ची भाषा सुरू होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी धानपिक पूर्णतः कोलमडून लाखो रुपयांची नुकसान झाली आणि शेतकऱ्यानी जगावं कसा असा प्रश्न निर्माण होऊन , शेवटी शेतकऱ्यानं मध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे यांना फोन करून सदर बाब लक्षात आणून दिली असता कॉ.विनोद झोडगे यांनी त्वरित दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी भर उन्हात हळदा येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रतक्ष भेट देऊन उन्हाळी धान पिकाची पाहणी केली व शेकडो एकर जमीन मधील एम.एस. ई.बी.कार्यालयाच्या दुर्लक्षित कारभारामुळे  पाण्याअभावी उन्हाळी धान पीक सुकल्याचे पाहून त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन गांगलवाडी येथील एम.एस. ई.बी. कार्यालय वर धडक देऊन मा.इंजिनिहर् हनवते साहेब यांना निवेदन व पाण्या अभावी सुकलेले धान्याच्या लोंब्या देऊन नवीन डीपी बसवून त्या शेत्रात वाघाची दहशत असल्याने दररोज दिवसा 8 तास कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्याची मागणी केली.

तेव्हा या  आंदोलनची दखल घेऊन मा. हनवते यांनी सायंकाळी 5 वाजता पर्यंत नवीन डी पी लाऊन कृषी पंप विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे .परंतु याची पूर्तता न झाल्यास येत्या 2 दिवसात ब्रम्हपुरी येथील मुख्य एम.एस. ई.बी. कार्यालय समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने कृषी पंप धारक शेतकर्यांचे संपूर्ण कुटुंब घेऊन मुक्कामी आंदोलन छेडण्याचा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.

यावेळी किसान सभा प्रमुख कॉ.विनोद पाटील, हळदा येथील अन्यायग्रस्त शेतकरी पांडुरंग राऊत,भाऊराव चीमुरकर,मोरेश्वर चिमुरकर,मुखरू राऊत, थामदेव चिमुर्कर,कमलेश म्हस्के, परसरामा राऊत, प्रमिला राऊत,महेश राऊत,चंद्रशेखर राऊत,मोतीराम भोपये,भाग्यवान चीमुरकार,स्वप्नील मोरांडे,बालाजी भोपये,विश्राम नखाते,पत्रू खेवले,फुलचंद राऊत,रमेश आलबनकर,दुधराम काटवले,यासह आदी शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते.

राहुल भोयर प्रतिनिधी

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!